Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ७२.
१६८७ श्रावण शुद्ध १३.
राजश्री चिंतोपंत तात्या गोसावी यांसि :-
अखंडित लक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने॥ महादजी शिंदे दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जाणें. विशेष. अलीकडे आपणाकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. त्यास सविस्तर अर्थ लिहित जावें. श्रीमंत राजश्री रावसाहेब देशास आले. त्यांची आपली भेट झाली असेल. त्यास, सविस्तर वर्तमान लिहून पाठवावें. येथील वर्तमान तपसीलवार कारभाराचें वगैरे राजश्री बाळाजीपंत यांनीं आपणास लिहिलें आहे, त्याजवरून कळेल. सारांश जातेसमई आपण आह्मांस सांगितलें कीं, वरीस भरेपर्यंत स्वहित किंवा अनहित मनास न आणावें; त्याजप्रों आपले वचनाचें दृढतर धरून त्याअन्वयें आहों. दुसरा मार मातुश्रीबाईकडून पत्रें आलीं. त्यांत मजकूर कीं, घरीं पंच्यवीस हजार रु।। खर्च काढून भक्षिले, त्यास कर्जदार ऐवजाची निकड करितात, याची तरतूद करून पाठवणें ह्मणोन. त्यास, आह्मांपासीं ऐवज आहे किंवा नाहीं, आणि येथें तरतूद होती अथवा नाहीं, आणि येथें तरतूद होती अथवा नाहीं, हा अर्थ सर्व आपणास ठावकाच आहे. याजकरितां हें पत्र आपणांस लिहिलें आहे. तरी आपण पंच्यवीस हजार रु।। कर्ज मातुश्रीस देवावे. आम्ही व्याजासुद्धां ऐवज जेथें सांगाल तेथें पावते करूं. मुख्य आपणांस लिहिल्यावरून ऐवज पावेल हा भरंवसा जाणून लिहिलें आहे. तरी लिहिल्याप्रों। कार्य करून उत्तर पाठवावें. वरकड सर्व गोष्टी आपण बोलले आहांत त्याजवरी कायम आहों. कळावें रा। छ ११ सफर.
मातुश्रीस रहावयास जागा पेडगांव द्यावें ह्मणून करार होता. परंतु अद्यापिवर तें काम जालें की न जालें हें लि॥ नाहींत. कार्य करून द्यावें. हे विनंति.