Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक ७९.

१६८७ .

राजश्री नारोपंत नाना गोसावी यांसि :-
अखंडित लक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नेहांकित महादजी सिंदे दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत गेलें पाहिजे. विशेष. पूर्वी दोन च्यार पत्रें आपणास पाठविलीं त्यांचें उत्तर आलें कीं, दरबारचा बंदोबस्त करितों. आणि देशींहून वर्तमान आलें कीं, लोकांचे घरीं चौकिया बसऊन उपद्रव केला आहे व महालींहि जप्ती केली. एशियास, पूर्वी कच्चे वर्तमान इकडील जें जालें तें लिहिलेंच आहे. तरी आपण व राजश्री विष्णु महादेव एकत्र होऊन दरबारचा बंदोबस्त करावा. आपण उभयतां करितील ते आह्मांस मान्य आहे. प्रस्तुत इकडील वर्तमान कोटेयाजवळ मुक्काम आहे. कोट्याची खंडणी जाहली व मारवाडचीही खंडणक्ष होऊन विल्हेस लाविलें. अत:पर राजश्री मल्हारजी होळकर यांजकडे जात आहों. त्यांचा मुक्काम प्रस्तुत दतियानजीक आहे. ते आह्मीं एकत्र होऊन कितेक सरकारी कामें मातबर करावीं, हाच अर्थ चित्तांत धरिला आहे, दुसरा प्रकार नाहीं. लोकांचे घरीं चौक्या बसल्या आहेत, याजमुळें लोक दिलगीर आहेत. परंतु, कांहीं आह्मांस सोडून जातात, ऐसा अर्थ नाहीं. तशाहीमध्यें लोक दिलगीर जाहलियानें साहेबकाम निखालस होत नाहीं. याजकरितां उभयतां आपण चित्तावर धरून, जेणेंकरून चोकिया व जप्ती उठोन सरदारीचा बंदोबस्त होय, तो अर्थ करावा. आमची धणियाचे पायांपाशीं एकनिष्ठता आहे. दुसरा अर्थ कांहीं नाहीं. ऐसें असोन, देशीं हा उपद्रव करावा यांत धणियाची किफायत आहे कीं काय, येंविसीं श्रीमंतांसही पत्रें लिहिलीं आहेत. प्रविष्ट करून, उत्तरें पाठवावीं. सर्व प्रकारें भरंवसा आपला. असें असतां लोकांचे घरीं उपद्रव होतो व माहलची जप्ती केली त्याचा अद्यापि कांहींच बंदोबस्त आपण करीत नाहींत, यावरून अपूर्व आहे. याउपरी तरी श्रीमंतांची मर्जी काय हें मनास आणून ल्याहावें. त्याप्रों वर्तणूक केली जाईल. आज पंचवीस हजार फौज आह्मांपाशीं असोन, माघील बखेड्यामुळें मोठ्या मनसब्यास उपयोगी पडत नाहीं. याकरितां लि॥ असे. र॥ छ.२२ सफर. बहुत काय लि।। ? लोभ असो दीजे. हे विनंति.

(मोर्तब सुद.)

श्री जोति:स्वरूप चरणिं तत्पर जया- जीसुत जनकोजि सिंदे निरंतर