Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक ३५२.

१७२४ आश्विन वद्य २.

पो।। छ १६ जमादिलाखर सु॥ सलास मयातैन व अलफ.
शेवेसी विनंती शेवक गोपाल हरी पटवर्धन चरणावरी मस्तक ठेऊन शिरसाष्टांग नमस्कार विज्ञापना. तागाईत छ १५ जाखरपावेतों शेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष. आपण पत्र पाठविलें तें पावलें. लिहिला मजकूर सविस्तर कळला. दंगियामुळें आपण मुलामाणसांसुध्धा इकडे येणार. समागमें श्रीमंताकडील येक दोन शास्त्रज्ञांची कुटुंबे येतील त्याची बरदास्त व्हावी ह्मणोन आज्ञा. त्यास रावजी ! आज्ञेप्रमाणें बरखास्त थोडी बहुत होईल. चिंता नाहीं. परंतु पुणियांतील पलणकरी आले आहेत. त्यांणी दाटी फारच केली ती आपलेकडून बापोजीपंत दाजी आले त्यांणी पाहिलीच आहे. तशात आपलें व शास्त्रीबाबाचें येणे जाल्यास जाग्याची सोय थोडी बहुत होईल. कळावें. बहुत काय लिहिणें ? कृपालोभ असो दीजे. हे विज्ञाप्ति.