Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीम्हाळसाकांत.
लेखांक ३४७.
१७२२ पौष वद्य ८.
मशरुल अनाम देशमुख व देशपांडे पो। रावेर यांसि कासीराव होळकर सु॥ इहिदे मया तैन व अलफ राजश्री त्रिंबकराव चिंतामण यानीं श्रीमंतांचें पत्र रजबचे आणिलें कीं प्रांत खानदेश येथील कानगोईचे वतन खंडोगंभीरराव व चिंतो विठ्ठल यांचे त्याची जफ्ती पेशजी सरकारांत केली होती त्यास चिंतो विठ्ठल निधन पावले त्यांचे पुत्र त्रिंबकराव चिंतामण यांजवर कृपाळू होऊन यांचे हिश्शाचे वतनाची मोकळीक आसे तरी तुह्माकडील महालानिहायचे मामलेदार व जमीनदार यांस ताकीद करून पूर्वी चिंतो विठ्ठल यांजकडे वतन चालत होतें त्याप्रमाणें यांजकडे चालवणें ह्मणोन त्यावरून हें पत्र सादर केले असें तरी तुह्मी सरकारसनदेप्रों।। पा।। -मजकूर येथील कानगोईचें वतनाचा हक्क रुसू व इनाम वगैरे व पानपान कानू- कायदेसुध्धा पेशजी चिंतो विठ्ठल याजकडे सुदामत चालत आल्या बा।। मशार-निलेकडे चालवणें व कागदपत्राचा शिरस्ता पूर्वी मोगलाई अमलांतील असेल त्या अन्वयें यांचे दफ्तरी देत जाणें जाणिजे छ २२ साबान मोर्तब सूद.