Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ३५१.
१७२४ श्रावण शुद्ध ९.
श्रीमंत राजश्री रावसाहेब स्वामीचे सेवेसी.
विनंती सेवक कृष्णाजी बाबूराव कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति विज्ञापना येथील कुशल ता।। श्रावण श्रु।। ९ नवमी रोज रविवार पावेतों मुक्काम शहर बऱ्हाणपूर येथे वर्तमान यथास्थित असे विशेष स्वामीनीं कृपा करून आषाढ वद्य ५ चें पत्र पाठविलें तें श्रावण श्रु।। ५ अस्तमानी पावले लिहिला मजकूर कळला पत्री आज्ञा जे राजश्री गणेश शिवराम वकील राजेबहादार यांचे पत्र लष्करांतून आले जें वतन समंधी ताकीदपत्रें व सोड-चिठीची सरकाराची जाली आहे राजश्री बापू चिटणीस यांजकडे परवानगी जाली आहे तर मागाहून लवकरच ताकीद पत्रें व सोडचिठी पाठवून देतों. ठराव जाला आहे त्याचे ऐवजाची तजवीज करणे ऐसें पत्र आषाढ वद्य त्रितीयेस आलें पूर्वी हजार रुपयांचा करार जाला होता हालीं चार रुपये कमजास्ती पडतील तरी मोतीराम वगैरे यांसी ताकीद करून ठेवणें पत्रें दाखल जाहाली ह्मणजे ऐवज देणें लागेल सोडचिठी येऊन काम सुरळीत चालू जालें ह्मणजे खासा स्वारीसमंधी हजार दीड हजार रुपये खर्च पडेल तरी याची तरतूद करणें व पालखीचा सरंजाम करावयाचा आहे तें लिहून पाठवू त्याप्रमाणें करणें अडीच तीन हजार रुपये लागतील याची तजवीज करणें ऐसी पत्रीं आज्ञा सुचवली त्यासी एक बऱ्हाणपुरचा आकार सालाबाद पांच साहासे रुपये त्यांत महाल मजकूर खर्च जाऊन बाकी दीड दोनशें रुपये राहातात ते जप्तीवाला नेतो यास्तव इतके ऐवजाची सोय येथें होणार नाही सोड-चिठी आलियावर कोणाचे माथा काम मारिलें तरी हजार बाराशे रुपये देईल त्यासी स्वामीचें अभय पत्र लागेल आमचा विश्वास तरी कोणास नाही पूर्वी राजश्री अमृतरावजींनी कारभार केला त्याचे फडशा अद्याप जाले नाहींत याजकरितां सावकारमंडळी अनमान करितील हाली कामावर हरकोणी रुपये स्वामीचे खोतरेवर देईल चिंता नाहीं गुमास्ते मंडळीचा भ्रममात्र आहे घरांत पाहावे तर नकार घंटाच आहे बाहिर पाहावे तरी श्रीमंतांचे पदरचे कारकून यास्तव यजमानाचे नांवासारीखें राहावे लागतें गुमास्ते मंडळीत तरी चांगला माणूस कोणी राहिला नाही की तोडजोड करील हाली सरकारची आज्ञा त्यासी तेही आपले आज्ञेखेरीज नाहींत त्यांचे शक्तीप्रमाणें आज्ञा जालियास हाजर आहेत परंतु वर कड माहालयाकार्यास सामल जाले पाहिजेत त्याची तजवीज स्वामीचे स्वारी इकडे आली ह्मणजे सहजांत होऊन येईल भुसकुटे यांसी विचारले त्यांनी उत्तर केले कीं तूर्त आह्मीं आपले घोरांत असो आह्मांकडे ऐवज मिळणार नाही हालीं त्याजकडील मामलती निघाल्या आहेत आपल्याकडील काम कबूल करीत नाहींत आपले आज्ञेवरून मशारनिल्हेस दाहा पांच वेळा विचारलें त्यांचे मर्जीस येत नाही दुसरियास बोलावे तरी ऐवजाशिवाय पैसा देत नाही यास्तव खानदेश सुध्धां ऐवजाची तजवीज होईल स्वामीची स्वारी या प्रांती आलियावर गुंता पडणार नाही पालखीचा सरंजाम करावयासी आज्ञा त्यासी तेथून याद येईल त्याप्रमाणें केला जाईल व लष्करांत काय खर्च पडेल त्याची व पालखीचे सरंजामाची येथे सरबराईकडील सिंद्याकडील महालावर होईल चिंता नाही वरकड स्वारीचा खर्च खानदेशप्रांती महालनिहाय गुमास्ते मंडळीस पत्र दाखविले त्यासी सेवेसी विनंति-पत्र लिहिले आहे त्यावरून कळों येईल श्रावण श्रु॥ १ प्रतिपदेची विनंतिपत्रे डोंकेसमागमे पाठविलीं आहे तें पावलें असेल लष्करांत मशारनिल्हेकडे पत्र रवाना करून सत्वर बंदोबस्त होय तें जालें पाहिजे येथें खंडेराव मोरेश्वराकडील कारकून जप्तीवर आहेत त्यासही परभारें वर्तमान कळलें त्यास मशारनिल्हेचे बोलणे जे खंडेराव मोरेश्वरयाची सोड-चिठी आल्याशिवाय काम सोडणार आणवावें याउपर जप्तीवाल्याकडील वसूल नजाय तें जालें पाहिजे सिंद्याकडील माहाल यांची याद पाठविली आहे ते पावेल लष्करांत पत्रें परभारे रवाना करावी आणि इकडेही लष्करांत पाठवावयास दीक्षितांचे नांव व गणपतरावजीचे नावें ऐसी दोन पत्रें पाठविली पाहिजेत ह्मणजे येथून लष्करांत पाठऊं उत्तर आणवून सेवेसी पाठवून देऊं बहुत काय लिहिणें लोभ करावा हे विज्ञापना.