Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीम्हाळसाकांत.
लेखांक ३४५.
१७२२ पौष वद्य ८.
राजश्री आपाजीराव निंबाळकर क॥दार पें॥ रावेर गोसावी यांसि
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने॥ कासीराव होळकर राम-राम विनंती उपरी राजश्री त्रिंबकराव चिंतामणयानीं श्रीमंताचें पत्र छ ६ रजबचें आणिलें कीं प्रांतखानदेश येथील कानगोईचें वतन खंडोगंभीरराव व चिंतो विठ्ठल यांचे त्याची जफ्ती पेशजीसरकारांत केली होती त्यास चिंतो विठ्ठल निधन पावले. त्यांचे पुत्र त्रिंबकराव चिंतामणयांजवर कृपाळू होऊन यांचे वतनाची मोकळीक केली आहे तरी तुह्माकडील माहाला निहायचे मामलेदार व जमीनदार यांस ताकीद करून पूर्वी चिंतो विठ्ठल याजकडे वतन चालत होतें त्या णों।। यांजकडे चालवणें ह्मणोन त्यावरून हें पत्र लिहिलें असे तरी तुह्मीं सरकारसनदेप्रमाणें पे॥ मार येथील कानगोईचे वतनाचा हक्करुसू व इनाम व घरे व मानपान कानूकायदे सुध्धां पेशजी चिंतो विठ्ठल यांजकडे सुदामत चालत आल्याप्रमाणें मशारनिल्हेकडे चालवणें व कागदपत्राचा सिरस्ता पूर्वी मोगलाई अमलांतील असेल त्या अन्वयें यांचे दफ्तरी देत जाण र॥ छ २२ साबान इहिदे मया तैन व अलफ बहुत काय लिहिणें हे विनंती.