Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक ३४१.

१७२२ पौष.

राजश्री त्र्यंबक रावजी गोसावी यांसि :-
स्नो।। विठलराव होळकर दंडवत. विनंति. उपरी तुह्मी हरिपंतांचे नावें चिठी पाठविली की अकरा गोण्या गोविंदा बराट याच्या हवाला करणें. न केल्यास कामास पडणार नाही ह्मणून लिहिलें त्यास गोण्यास आज तीन रोज जाले तेव्हाच अशी निक्षून चिठी पाठविली असती तर गोण्या माघारा दिल्हे असत्या. तुह्मांखेरीज दुसरा विच्यार नाहीं. परंतु काल सगळा वीळ वाट पाहिली. कोणीच न आलें तेव्हां लोकांच्या गवगव्यामुळें गोण्या फोडून वाटून दिल्हे. तुह्मांस कळावें. आता जैसे तुह्मांस कळेल तैसी रावसाहेबांस विनंति करून सांगावें. पूर्वी आह्मांस असेच कळलें असतें तर गोण्या न फोडतों. दुसरे मुलास देवी निघाल्या आहेत. तर कनाता दोन जरूर पाठवणें. बहुत काय लिहिणें ?* हे विनंति.