Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ३४०.
१७२२ मार्गशीर्ष वद्य ४.
राजश्री बखत रामभाई आगरवाले गोसावी यांसि
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य श्ने॥ गोपाळराव त्र्यंबक राजेबहादर आशिर्वाद उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित गेलें पाहिजे विशेष बहुत दिवस जाले तुह्माकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं त्यास असें न करावें तर हमेशा पत्र पाठऊन स्वकुशल वर्तमान कळवित जावें तुमची बडती ऐकोन बहुत संतोष आहे ऐशास राजश्री त्रिंबकराव चिंतामण सर-कानगोईचें वतन प्रांतमजकुरी आहे त्यास राजश्री सुभेदार यांजकडून सुभा आपलेकडे आहे हें जाणोन सरकानगो याचें वतना बंदोबस्त माहालानिहाय बितपसिल
१ सरकार बिजागडचे खरगोण बतीसी
ए॥ महाल.
ए॥ कलमें. ३३
१ पो।। आडावद.
१ पो।। सुलतानपुर.
१ नंदुरबार.
१ पो।। उत्राण.
१ पो।। आंबेपोतडे
१ दुमालेगांव फुट जागिर तुमचे यजमानाचे सरकारांत आहेत. ते कलमें.
एकूण सात महाल सरकार विज्यागड खरगोण बत्तीशी महाल तेहतीस व फुटजागिरीचें गांव सिवाय सदरहू येथील हकरुसू दर सद्दे रु॥ १ व गाव- गन्ना सालिना दर गावीं रुपया १ जगात भुसार व किराणा व कापड सुध्धा व मोहतर्फा व शेव-संबजी वगैरे व परगणे सुलतान-पूर येथील हवालदारी बाब येणें प्रों।। आहे ये विशई यांजकडून आह्माकडे कारकून येतील ते तुह्मांस वर्तमान वतनाचें निवेदन करतील त्याप्रों।। बंदोबस्त करून देवावयाचे वत्नाचें कामकाज सुरळीत चालऊन हक्करुसू पावित जावे रा॥ छ १७ रजब बहुत काय लिहिणें हा आशिर्वाद.