Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ३३७.
१७२२ आषाढ वद्य ३.
मयराळजी बीन सिवापा वाणी होणराव कोठवळे नि॥ श्रीमंत मातुश्री आनंदीबाई साहेब याचे तीर्थस्वरूप सिवापाकडे कर्ज लक्ष्मण भट दिवेकर यांचें येणें रुपये बाराशे, त्याचे खत भास्कर माहादेव काणीटकर याचें नावाचें शके १६९४ चे सालीं करून घेतलें. त्यास ऐवज याचे घर कसबे पुणें पेठ रविवारांत पुरातन नांदतें कवलारी. त्याची हमशाई. उत्तरेस दामोदरदास कोठारी. व दक्षनेस भिवजी कोठवळे. पश्चिमेस रस्ता. व पूर्वेस ++++ मुदत येका वर्शाची व्याज दरमहा दर शेकडा एकोत्रा प्रों।। अन्वयें खत लिहून घेतलें यावर मुदतीवर व्याजसुधा रुपयाचा फडच्या करून द्यावा आन आपलें घर सोडवून घ्यावें तों आह्मी तीर्थरूपसुधां श्रीमंतसाहेबाचे स्वारीसमागमें पुणियांतून गेलों पाठीमागें गर्दी जाली. वस्तभाव लुटली गेली. मूल लेकर गरीबतारीत येऊन परागदा जाहला. ते अवांतर जागीं जाऊन राहिली. श्रीमंत बाईसाहेबाची स्वारी धारेकडून सुरतेस आली. आवया तवया भोगिला तो अकस्मात तीर्थरूप सिवापा निवर्तले उपरातीक कालेकरून साहेब पुणियास आले. ते समयीं सेवक हि चाकरीस धणियाच्या पायापासीं आला. दिवेकर याजपासदीं जाऊन त्यास मतलें कीं ई॥पासून घराचें भाडें काय वसूल जाहलें तें आह्मांस समजावणें ऐसे बोलोन दोन तीन महिने केलें परंतु ते कांही आह्मांस समजाविना. मग कृष्णाजी परड हुजरे नि॥ सरकार याचे वि॥ साहेबास अर्ज केला तो धणियांनी मनास आणून दिवेकर यास हुजूर बोलाऊन सांगितले कीं याचा हिसोब ई॥पासून घराचें भाडें काय वसूल जालें हें सरकारांत समजावणें त्याजवरून दिवेकर यांणी आपला हिसोब आणून सरकारांत समजाविला. त्याची चवकसी करता घराचें भाड्याचे रुपये ४१०८ च्यार हजार एकसे आठ शके १७२० चे सालापावेतों वसूल जाहलें. त्याजपैकी घराकडे खर्च रु।। ३२५॥- तिनसे पंचवीस नऊ आणे जाहले बाकी ३७८२। तीन हजार सातसे बयासी रु।। सात आणे निकालस पावती घरापैकी दिवेकरास जाहली. येसें साहेबाचें ध्यानास येतांच होणराव याचे घरांतील भाडेकरी महंद हुशेन ताजभाई व विश्राम इसमायल बहुरियास सरकारांत बोलाऊण आणून ताकीद केली मीं दिवेकर यास भाडें न देणें. तवा बहुरी यानें अर्ज केला की दिवेकर यांणी आह्मापासून भाडेचिठी सिवराम नारायण आठवले या घराची यास लिहून देविली आहे. साहेबांनी त्यास सांगावें त्याजवरून आठवले यास हुजूर बोलाऊन सांगितलें की बहुरियास या घराचे भाड्याबद्दल तगादा तुह्मी आमचा परवाणीबिगर न करणें आयसें सांगून दिवेकर आठवले यांस सांगितले कीं तुह्मी सरकारांत येऊन चवघे सावकार व दिवेकर आठवले यास विचारलें की मुदल रुपये बारासें सावकाराचें कुलाकडे येणें- कुलाकडून पावती तीन हजार सातसे ब्यायेसी रु।। सात आणे वसूल सावकारास पावला असता सावकार कुळाचें घर सोडीत नाहीं त्यास तुह्मीं पंचावीत मतें सांगावे. तव चवघांनी साहेबास समजाविलें की कुलाकडे सावकाराचा कांही दावा राहिला नाहीं. कुळाचें घर व खत व बहुरियाची भाडेचिटी आयेसी सावकारांणीं द्यावी. आयेसें चवघांणीं साहेबास समजाविलें तें समईं दिवेकर व आठवले यांस सांगितले की चवघांचे मतें आयसें ठरले. तुह्मी या घराचें खत व भाडेचिठी बहुरियाची बहुरियास देणें तें समईं बहुरी याजकडे घराचें भाडें आटकाविलें होतें तें बहुरियास आठवले यांणी सांगितलें की तुह्मी मयराळ बीन सिवापा होणराव यास घराचें भाडें सरकारांतून तुह्मांस ताकीद देऊन आटकाविलें त्या दिवसापासून मारनिलेस देणें तुह्माकडे आमचा कांही ताबा राहिला नाहीं. तुमची भाडेचिठी या घराबद्दल आह्माजवळ आहे ती आह्मी तुह्मांस देऊ. आयेसें सरकारांत साहेबास हुजूर दिवेकरव आठवले यांणी प्रमाण करून गेले की मयराळ होणराव याच्या तीर्थरूपाचें नांवचें होतें त्याचे त्यास देतों व बहुरियाची भाडेचिठी बहुरियास देतों. येणेंप्रमाणें मयराळ बीन सिवापा वाणी होणराव याचा व दिवेकर याचा फडच्या करून घेऊन याचे घर याचें हवाला केलें. पुढें काही दावा या घरावर दिवेकर याचे कर्जाचा व सरकारचे नजरेचा राहिला नाहीं. मयराळ बीन सिवापा यांणी आपलें घर स्वसंतोसें अनभवावें. भोडेचिठी गयेविले पडली. सबब आठवले यांणीं बहुरियास फारखती लिहून दिली. मिती आशाड व॥ ३ शके १७२२ रुद्रनाम संवत्सरे हस्ताक्षरे भिकाजी सिवराम आठवले.