Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक १९०.
राजश्री लक्षुमण अपाजी यासि :-
प्रती सौ॥ आनंदीबाई आशीर्वाद. सु॥ सबान सबैन मया व अलफ. हरि श्यागीर्द याजबरोबर पत्रें पाठविलीं तीं पावलीं व जबानीं निरोप सांगून पाठविले ते विदित जाहाले. ज्या गोष्टी भावी असतात त्या घडतात, त्यापक्षीं आह्मी दूरच आहों, हा भ्रमच बरा. विशेष कर्मफलाच्या गोष्टी काय ल्याहाव्या ? रवीसंक्रमणाचेतील शर्करायुक्त पाठविले आहेत ते घेऊन पावल्याचें उत्तर पाठवणें व यादु येवलेकर यास तीळगुळ देणें. खरकसिंग वगैरे आणखी कोणी जे आपले मंडळीचे असतील त्यांस आमचे तीळगुळ देणें. जाणिजे. छ १ माहे जिल्हेज. बहुत काय लिहिणें ? हे आशीर्वाद. नागो राम मुनसी यास तीळगुळ देणें. छ मजकूर. हे आशीर्वाद.