Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक १८५.


१६९८ अश्विन शुद्ध १५.

पु॥ राजश्री लक्ष्मण आपाजी गोसावी यांसि:-
सु॥ सबा सबैन मया व अलफ. कदाचित बारभाइचा तह बनल्यास रणगडास राहावें. त्यास, राहावयास जागा मजबूद चांगली असावी. तेव्हां गढी मजबूद बांधावयास दोन तीन महिने पाहिजेत. तेव्हां भडोचेस राहावें लागेल. त्यांत दुसरें ही एक आहे कीं, फितुरियांचा पुरता इतबार पडेतों जातांही येत नाहीं. कारण कीं ते दबा धरून, विसराखालीं पाडून, आपले कर्मास चुकावयाचे नाहींत. यास्तव आम्ही दोन महिने भडोचेस, दोन महिने रणगडास या प्रमाणें राहात जाऊं. आह्मांस आश्रा तरी भडोजचाच आहे. ज्या समयीं शिंदे, होळकर व इंग्रज दरम्यान राहातील, तेव्हां या गोष्टी ते करणार नाहींतसे दिसतें, परंतु सावधगिरीनें असावें हेंच खरें. सलूख जाहाला तरी आम्हांस आंगरेज मध्यें घ्यावे लागतीलच. मध्यस्थ आंगरेज, तेव्हां त्याचे तें राहाणें अवश्यमेव प्राप्तच आहे. एविसीं अगोदर सूचना जनरालास व ममतेचे आंगरेज व कोशलदार यांस असावी. बारभाईची व भाऊची लढाई सुरूं जाहाली. आह्मीं काय करावें तें आंगरेजांनीं सलाह सांगावी जाणिजे. छ १३ रमजान.

(लेखनावधि:)

बारभाईसी सख्यच ठरहलें तरी रणगडास जाऊं. तेथें पंधरा दिवस राहून भडोचेस येऊं. रणगडास किल्ला मजबूद करावा लागेल. घर राहावयास चांगले पाहिजे. तेव्हां सहा महिने तरी जलदीनें केल्यास पाहिजेत. तेव्हां भडोचेस राहावें, उचित दिसतें. आंग्रेजाचा आश्रा पाहिजे. विलायतेच्या हुकुमाचीहि वाट पहातच आहों. बंगाली यांचा हुकूम पाठवी तों तूर्त दोन लक्ष पाठवावें, ह्मणौन धोंडो खंडोजीनें लिहिलें होतें. त्याहि तूर्त देत आहों. बंगालकरास दाहाहि अंतस्त निदानीं कबूल करणें ह्मणोन लिहिलें होते. त्याणीं लिहिलें कीं, दोन लक्ष तूर्त पावावें, ह्मणजे हुकूम पाठवितो, बाकी बादज फते मागाहून पाठवावे. त्यांस, याचेहि तर्तुदेंत असावें. भडोचेस राहूनच करावे. त्यास एविसीं जनराल-कोशलाची सूचना गंभीरास व बाडमास असावी, गुप्तरूपें असावी. छ मजकूर. कांहीं मजकूर उदेभान चौकीदार रुबरू सांगेल.

(लेखनावधि:)