Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक १९१.


१६९८ .

तहनामा सरकार राजश्री रघुनाथ बाजीराव प्रधान यांचा व पुर्तकशाचा विद्यमान किल्ले गोंवेकर. सु॥ सबा सबैन मया व अलफ. सरकारची कुमक पुर्तकशांनीं करावी आणि सरकारांतून पूर्तकशास बदफत द्यावा तपशील :-

पूर्वीं फिरंगाण प्रांत गड किल्लेसह जो सरकारांत आला आहे तो दरोबस्त द्यावा. त्याप्रमाणें साष्टी अंग्रेजाकडे गेली. त्याचे ऐवजीं गोव्याचे लगता येक किल्ला व साष्टीचे बेटांत जितका ऐवज उत्पन्न होत असेल तितका ऐवजाचा मुलूख द्यावा. कलम १.

आम्हासी शत्रू घरचे व बाहेरील बेमबलक जाहाले आहेत. त्यांचा पक्ष एकंदरच कोण्ही विषईं करूं नये आमचे मर्जीप्रमाणें अनुकूल असावें. जें सरकारचे मित्र अथवा शत्रू तेच पुर्तकशानेंही आपलें जाणावें येणेंप्रमाणें कलम तिसरें ३.

पुर्तकशाची फौज गोरे व पागडीवाले मिळोन पांच हजार, निदान साडेचार हजार, असावी; व तोफा व गर्नाळा मिळोन तीस दागिने असावे. यास दारूगोळा पोख्त सामान बाळगावें. याचा खर्च वाजवी जो होईल तो गोंव्याहून सरंजाम निघेल त्या दिवसापासून ते मसलत शेवटास जाऊन सरकारांतून पुतर्कशाचे फौजेस निरोप देऊं तोंपावेतों आकार करून बंदरापावेतो ऐवज देऊं. गोंव्याहून सरंजामहुजूर येऊन पावल्यावर, सरकारचा मुलूक सुटत जाईल. त्याचा रुपाया येईल तो सरकारचे फौजेचे वगैरे खर्चाचे अजमासें व पुर्तकशाचे फौजेचे वगैरे खर्चाचे अजमासें वांटून घेत जाऊं. मसलत सेवटास जाऊन पुर्तकशाचे फौजेस रुखसत करूं तेव्हां कुलखर्चाचा आकार पुर्तकशाचा सरंजाम होईल, त्यांत हे पावती वजा करून बाकी ऐवज देऊं. हिसेबाचे रुईनें परस्पर वर्तावें कलम दुसरें.

एकूण तीन कलमें लिहिलीं आहेत. त्याप्रमाणें परस्पर चालावें. ही मसलत सेवटास गेल्यावर त्यानंतरही दिल्हासानें अनुकूल होत जावें. फौजेचा खर्च वगैरे कुमकेसंमधीं लागेल. तो देत जाऊं.