Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीशंकर.
लेखांक १३२.
१६९७ माघ वद्य ८.
राजश्री लक्ष्मणपंत अण्णा स्वामीचे सेवेसी :-
पोष्य सखाराम हरी कृतानेक प्रों विनंती येथील वर्तमान ता। माघ वद्य अष्टमीपर्यंत सुखरूप असो. विशेष. आपणाकडील माघ शुध द्वितीयेचीं व सप्तमी- नवमीचीं पत्रें आली तीं विस्तारें अक्षरशा सरकारचीं पाहिलीं व आह्मांस एक बंद पाटीपोटीं व पुरवणीचा वर्ख ऐसें लिहिलियानें सर्व मजकूर समजला. अण्णा ! आपण विस्तरें येथील मसलतीचे अर्थ ध्यानांत आणून कालजी करितां. येविसींचीं साधनेंही करितात, याचे प्रकार मजला विदित. आपणासारखे आपणच आहेत. परंतु यास तरी संशय नाहीं. मसलत पेंचांत पडली आहे. येथें उपाय नाहीं. गोष्ट बोलली आहे. सर्व श्रीमंतांनीं वरचेवर लिहिलेंच आहे. याउपरी कांहीं सुचत नाहीं. व लिहवत नाहीं. सारे विलग अर्थ जाले आहेत. त्यांतही आपले आपल्यांत विरुद्धें वाढलीं आहेत. इंग्रज आह्मावर कारनेल किटण रुष्ट जाले आहेत. त्यास संबोधनास आपले थोरले ग्रहस्त सरकारबावा अनुकूल. नारो गोपाल गोदादर्शनीं हे एकत्र होऊन रात्रंदिवस खलबतें करितात. श्रीमंताची मर्जी तरी सवत-मत्सरें वाढवावें. हें सर्व येथूनच आहे. यामुळें अधींच विलग. त्यांत हे अर्थ प्राप्त! तेव्हां बुडत्याचे पाय खोलीं, ऐसें जालें आहे. आह्मी येथें मुलें माणसें सुधा आहों. त्यास, कोणी आलिया संकटीं पडलों आहों. ऐशास इंग्रजी स्थलें सुरत भडोच. याशिवाय कोठें जागा नाहीं. सबब जनरालासी पक्कें बोलोन त्याचें आश्वासन घ्यावें. दोहीस्ते लाऊन हरयेक जागा ठेऊं. नंतरीं खातरेस येईल तिकडे जातील. त्यास मनाई न करावी. परवानगीनें ठेविली तैसी परवानगीनें जावी, ऐसें न करावें. बारीक मोठे पेंच सर्व ध्यानांत तुमचे आहेत. ल्याहावसें नाहीं. इतके अर्थास संभाळोन जें कर्तव्य तें करावें आणि अपटणास लेहून पाठवावें. वरकड गोविंदराव-बावाचे वगैरे मजकूर लिहिले ते सवीवर आहेत. येक श्रीमंताचे कल्याणाखेरीज बाकीचें नीट आहे. हे गोष्ट प्रमाणच आहे. त्यांतही साधन रदबदली करणें तितक्या करून ठेवाव्या. बावाची मर्जी करणें सर्व तुह्माखेरीज नाहीं. आपला ऐवज देवलाबाबत बेदरचे तलावरील गुतऊन ठेविला आहे. सांगाल ल्याहाल तेथें पावता करूं. वरकड दरबारीं मसलतसमईंचे कांहीं सुचत नाहीं. प्राणरक्षण कसें होईल हेंच सलाह पडलेलें आहे. अनुपत्यकालांत सर्व गोष्टी प्रतिकूल मसलतीस पडल्या आहेत. विलाज नाहीं. राजश्री आबा आले. ते आह्मी येक जागाच आहो. त्यामुळे नारिंगाची मसलतैक्य होऊन इंग्रज आह्मावर चिडविलें. त्यास सदाशिवबावा अनुकूल पडले आहेत. श्रीमंतास विनंती करून नारोपंताचें जाणें इंग्रजांकडे मना करविलें. त्यास त्या कामातून काढिलें, हें समजोन कर्नेलीजवळोन रदबदली सख्त श्रीमंतासी करविली कीं, त्याखेरीज दुसरा कामांत नसावा. ऐसें केलें आहे. तेव्हां कर्नेलीचे मर्जीस्तव नारोपंत फिरोन कामांत घालणें. प्राप्त. श्रीमंतांनीं अप्पाजीपंत निहाय नेमिले होते. परंतु आतां पुढें चालत नाहीं. इंग्रज दाब धरू लागले आहेत. मसलत विलग. त्यांत हे प्रकार बनले आहेत. ऐसे बारीक मोठे प्रकार किती ल्याहावे ? नाना प्रकारचे पेच व कटकटी ! कोणांत कोणी नाहीं ! ऐसी गोष्ट जाली आहे. इतकेंहि सोसून आमचा निश्चय जो आहे तोच खंबीर प्राण जाईतों सुटणार नाहीं. प्राणाचा संकल्प घालोन श्रीमंताची सेवा आरंभिली आहे. त्याचा शेवट करावा. एक वेळ फितुरियांचें पारपत्य व्हावें. श्रीमंत दौलतीवर बसले ह्मणजे कृतकृत्य जालों. पुढें इच्छा दुसरी नाहीं, यांत संशय नाहीं. कसेंही गुजरलें तरी श्रीमंताचे चरणाचें लक्ष व मसलतीचे शेवटास जाणियाचें ध्यान दुसरें कदापि होणार नाहीं, हे खातरजमा तुमची आहे व माझा निश्चय हाच यांत गुंता नाहीं. परंतु आढळले अर्थ लिहिले आहेत. श्रीमंताचे मर्जीत दुसरा प्रकार नाहीं, हे माझी खातरजमा. परंतु ज्याणीं जें समजवावें तें ऐकावें, हा प्रकार प्रारंभापासून आहे तो मात्र आहे. त्यास विलाज नाहीं. अस्तु ! श्रीकृपेनें मसलत मात्र सिद्धीस जावी, हेच काळजींत आहे. परंतु ऐशा बखेडियांनीं दुष्मन शेर होतात व कितेक येणारांसहि संशय पडतो. गोविंदराव गाईकवाडामुळें लोक दोष ठेवितील. आह्मासी इंग्रज असें चालल्यानीं श्रीमंतांचा व इंग्रजांचा इतबार लोक कसा धरितील. हे मसलतीस विरुद्ध हें समजोन श्रीमंतांनीं आज्ञा निक्षून करावीं, तें मात्र घडत नाहीं. अस्तु ! दैवच मसलतीचे विलग, त्यास यत्न काय ? तत्रापि जेथवर होईल तेथवर प्रेत्न सेवक लोकांनीं करावा, यांतच श्रेयस्कर जाणून श्रम साहास करीत आहों. परिणाम लावणार श्रीं व श्रीमंत आहेत. बहुत काय लिहिणें ? कृपा लोभ कीजे. हे विनंती.