Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक २
श्री.
१६८३ पौष शुद्ध १०
वेदशास्त्रसंपन्न राजश्री सदाशिवदीक्षित स्वामीचे सेवेसीः-
विद्यार्थी माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जावें. विशेष. निजामअल्लीखान यासी लढाई होत असतां जेर होऊन, त्यांणी सल्याचा संदर्भ लाविला. तेव्हां, नबाब मोगलअल्ली व राजश्री रामचंद्र जाधवराव तिकडून फुटोन आले. त्याची जागीर चाळीस लक्षाची निजामअल्लीखान याजपासून घेऊन सला केला. ते-विसीचें वर्तमान राजश्री स्वामीस सविस्तर विनंतिपत्र लिहिलें आहे. पत्रे प्रविष्ट करावें. जाणिजे. छ ९ जमादिलाखर १ बहुतकाय लिहिणे ? हे विनंति.