Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ७०

श्री ( नकल )
१६९२ आश्विन शुद्ध ११

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री नरसिंगराव जनार्दन धायगुडे गोसावी यांसी:-

सेवक माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार, सुा इहिदे सबैन मया व अल्लफ, राजश्री भिवराव यशवंत तोफखानासुद्धां मनोळीस पाठविलें. तुझी हैदरखानाचे फौजेच्या तोंडातर ५०० पांचशें राऊत बंकापुराजवळ ठेऊन तह्मी व राजश्री शाहाजी भोंसले मनोळीस येऊन, मारनिले व तुह्मी एकत्र होऊन, मनोळी हस्तगत करणें ह्मणोन तुह्मांस पत्रें मुजरत जासुदाबरोबर पाठविलीं तीं पावलींच असतील. तिकडील बंदोबस्त करून, तुह्मीं मनोळीस यावयाचें केलेंच असेल नसेल तर करणें. भिंवराव यशवंत निरोप घेऊन येथून गेले. तुह्मीं जलद येऊन यांस सामील होणें. जाणिजे. छ १० जमादिलाखर. बहुत काय लिहिणें? लेखन सीमा.