Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६६.
श्री.
१६९२ श्रावण वद्य १४
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री नरसिंगराव जनार्दन गोसावी यांसी.
सेवक माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार सुा इहिदे सबैन मया व अल्लफ, तुह्यीं विनंतीपत्र पाठविलें तें प्रविष्ट झालें. हैदरनाईकाकडे लोक चाकरीस व पुढें जाणार त्यांची चौकशी करीतच आहों, येविशीं तालुकदारांसहि आज्ञा करावी, ह्मणोन लिहिलें तें कळलें. ऐशास, तालुकदारांस पत्रें पाठविलीं आहेत. ते व तुह्मी मिळून चौकशी करणें. गेले असतील त्यांची घरे, कबिले, जप्त करणें. तिकडील वर्तमान वरचेवर लिहित जाणे. जाणिजे, छ २८ रबिलासर बहुत काय लिहिणें. लेखन सीमा.