Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ६९

श्री ( नकल.)
१६९२ भाद्रपद वद्य ३०

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्यराजश्री नरसिंगराव जनार्दन धायगुडे गोसावी यांसीः-

सेवक माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार सुा इहिदे सवैन मयावअल्लफ टिपू चैनगिरीस होता. तो श्रीरंगपट्टणच्या रानांत गेला. कांहीं पांच सातशें राऊत जडे अन्वटीकडे आले ह्मणोन बातमी आली. व जडे अन्वटीचे राऊतांचे तोंडावरी नबाबाचेहि राऊत व हशम गेलेच आहेत. तूर्त तिकडे विशेष गडबड नाहीं. तथापि तुह्मीं पांचशें राऊत त्या शहरावर बंकापूरसमीप ठेवणें, राजश्री भिवराव * यशवंत यांस तोफखान्यासहित मनोळीच्या पारपत्यास जावयाची आज्ञा केली असे. तर तुह्मी पांचशे राऊन बंकापुराकडे पाठवून बाकी जमावानिसी भिंवराव याजपाशीं येऊन, मनोळीचें ठाणें हस्तगत करणें. जाणिजे. छ २८ जमादिलोवल. बहुत काय लिहिणे? लेखनसीमा.