Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६२७
श्री लक्ष्मीकांत.
१७२४ माघ वद्य १
राजश्री नारायणराव वैद्य गोसावी यांसीः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो रघोजी भोंसले सेनासाहेबसुभा दंडवत विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीये कुशल लिहित जावें. विशेष. यापूर्वी तुम्हांकडील पत्रांची उत्तरें वरचेवरी व रांगडे माणसासमागमें जीं पाठवावयाचीं ती पाठविलीं आहेत. पोहोंचून सविस्तर समजण्यांत येईल. राजश्री सदाशिव बापूजी याणीं तेथील ऐकिलें जें वर्तमान तें लिहिलें होतें. हें समजोन त्याचेंहि पत्राचें उत्तर पाठविलें आहे. व प्रसंगीचें वर्तमान राघोधोंडदेव लिहितां कळेल, वरचेवरी पत्र पाठऊन वर्तमान लिहित जावें. रा छ १४ माहे शवाल, बहुत काय लिहिणें ? हे विनंती. मोर्तबसुद.