Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ४५.
श्री
१६८९ माघ शुद्ध १३
नकल
राजश्री गोविंदराव कृष्ण, कादार पा शाहाजांपूर, गोसावी यांसीः-
अखंडित लक्ष्मी राजमान्य स्नो महादजी शिंदे दंडवत. सुा समान सितैन मया व अलफ. तुह्मांकडून पेस्तर सालचे ऐवजीं खरेदी कापड गुा अबाजी नाईक कांबरस व रामचंद्र नाईक परांजपे, साहुकार पुणेकर, रदकर्ज रुो ७५००० पाऊण लाख रुपये देविले असेत. तरी पा मजकूरचे ऐवजीं रसदेच्या भरण्याबा ऐवज श्रावण मासीं पावता करून कबज घेणें. दुस-या वराता तुह्मांवर जालियास हा ऐवज अगोदर देऊन मग दुसरी वराताचा ऐवज देणें. जाणिजे. छ १० माहे रमजान. बहुत काय लिहिणें ? हे विनंति. सदरहू ऐवज वायद्याप्रमाणें पुण्यास पावता करूं. हे विनंति.
सदरहू वरात तुको शामजी याजबा पाठविली असे.