Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५०६
श्रीह्माळसाकांत.
१७२२ मार्गशीर्ष शुद्ध ९
राजश्री मोत्याजी कालगावडे गोसावी यांसीः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो काशीराव होळकर रामराम विनंती उपरी. श्रीक्षेत्र प्रवरासंगम टोंकें व कायगांव तिरस्थळी गंगातीर, तेथें तुह्मीं मनस्वी उपद्रव देऊन ब्राह्मणथोर-ज्यांस श्रीमंत सामोरे येऊन महत्व राखून बहुत दिवस चालवीत आले. येवनादिकांनीही तिळप्राय तोशीस दिल्ही नाहींत्यांस तुह्मीं चाप लाऊन मारहाण अप्रतिष्ठा बहुत केली. कोणाची अब्रू राहू दिल्ही नाहीं ! आणि पुढेंही उपद्रव करतां, पैका मागतां. ऐशा बोभाट्याचें पत्र सरकारांत आलें व श्रीमंतास आलें. ऐशियास, क्षेत्रींचे ब्राह्मणास कोण्ही तिळप्राय उपसर्ग देत नाहींत, रखवालीच करितात. ( शिक्का ) व आपलेंही सरकारांतून कोणे वेळेसही उपद्रव द्यावयाची चाल नाहीं. ऐसें असतां, तुह्मीं मनस्वी वर्तणूक अरंभिली, याचें कारण काय ? याजकरितां येथून हुजरे व जासूद रवाना करून हें पत्र लिहिलें असे. तर पत्रदर्शनीं ब्राह्मण तिरस्थळीचे यांस काडीमात्र तोशीस न लावितां, जो काहीं ऐवज घेतला असेल, तो माघारीं देऊन ब्राह्मणांचे मानमहत्व राखून, त्यांची खातरी करून, तेथें मुक्काम न करितां कूच करून जाणें. या अन्वयें न घडल्यास, परिछिन्न उपयोगीं पडणार नाहीं. येविशीं श्रीमंतांची निक्षूण ताकीद आहे. दुसरे पत्राचा आक्षेप न करितां, ब्राह्मणाचा बोभाट येऊ नये. रा। छ ७ रजब.