Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५०१
श्री.
१७२२ वैशाख शुद्ध ९
अजम सिद्दी बिलालखां दामोबतहूं.
अज दिल्हे येकलास सिदोजीराव नाईक निंबाळकर सरलष्कर सलाम. येथील खैरखुसी जाणून कलम ताजा करीत जावें. तुम्हीं जदीद सिदी व अरब व हिवसी याचे उमेदवारीचा मजकूर लिहिला. त्यास विलायत आरब याचा सिरस्ता दरमहा रुपये १६ व सिदी याच दरमहा रुपये १३ तेरा व मालपे याचा दरमहा रुपये ११ येंणें प्रों आहे. त्यास तेथें किती लोक असतील तें पत्र पावतांच घेऊन येणें. सिवाय हिवसी व सिलेदार घेऊन येणें. घोडेमाणूस पाहून बंदोबस्त करून दिल्हा जाईंल व तुमचे जातीचा बंदोबस्त येथें आल्यावर हुजूर करून देऊ. जाणिजे. छ ८ माहे जिल्हेज. ज्यादा काय लिहिणे? हे किताबत.