Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक २७७

श्री. १७०६ चैत्र शुद्ध ८



आज्ञापत्र समस्तराजकार्यधुरंधरविश्वासनिधि राजमान्यराजश्री माधवरावपंडितप्रधान ताहां मोकदम, मौजे कामेरी, ता। वंदन, प्रांत वांई. सु।। अर्बा स. मानीन मया व अलफ, शके १७०६ क्रोधीनाम सवंछरे. राजश्री विसाजी कृष्ण, उपनाम चिंचळकर, गोत्र वशिष्ठ, सूत्र आश्वलायन, मौजे तेरवण, ता। राजापूर प्रांत मजकूर, यांण हुजूर का। पुणें येथील मुकामीं विनंति केली कीं, आपण बहुत दिवस स्वामीसेवा एकनिष्ठपणें केली, कुटुंबवत्सल आहों, योगक्षेम चालिला पाहिजे, यास्तव स्वामीनीं कृपाळू होऊन आपणास कुटुंबाचे योगक्षेमार्थ एक गांव नूतन इनाम करून देऊन चालविले पाहिजे ह्मणोन. त्याजवरून मनास आणितां, यांणीं बहुत दिवस स्वामीसेवा एकनिष्ठपणें केली, कुटुंबवछल आहेत, यांचें चालविणें अवश्यक जाणोन, यांजवरी कृपाळू होऊन, यांस कुटुंबाचे योगक्षेमार्थ मौजे मजकूर हा गांव स्वराज्य व मोगलाई एकूण दुतर्फा देखील सरदेशमुखी दरोबस्त वमय साहोत्रा, कुल बाव, कुल कानू, हल्ली पट्टी व पेस्तर पट्टी, खेरीज हक्कदार व कदीम इनामदार करून, जलतरुतृणकाष्टपाषाणनिधिनिक्षेपसहित इनाम तिजाईसुद्धां सरकारांतुन नूतन इनाम करून दिल्हा असे. तरी, मौजे मजकूर सदरहूप्रमाणें यांचे दुमाला करून देऊन, यांस व यांचे पुत्रपौत्रादि वंशपरंपरेनें इनाम चालविणे. दरसाल नवीन सनदेचा आक्षेप न करणें. या सनदेची प्रति लेहून घेऊन, हे अस्सल सनद यांजवळ भोगवटीयास पुरतोन देणे. जाणिजे. छ ७ जमादिलावल. आज्ञाप्रमाण. लेखनसीमा.