मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक २७८

श्री. १७०६

यादी आजमास राजमंडळाच्या खर्चासी रु सु।। खमस समानीन जमा रुपये.

६०००० बत्तीससिराळें येथील ऐवज.
१०००० शाहार सातारा छल्या व नकासा व जकात. व पेठा गुरुवार बुधवार व सोमवार व रविवार.
१०००० हत्तीचा ऐवज सचिवपंत यांजकडून.
३५०० इंदापूरचे देशमुखीपैकीं.
३७०० महादजीपंत यांजकडे सावोत्रा वगैरे.
२००० थोरला वाडा करंजेचा ऐवज.
२००० उबार जमीन किल्ला सातारापैकीं.
२००० बळवंतराव बाजी याचा सरंजाम जप्ती.
५० मौजे पळसीची सेरी.
१७०० कुरणाकडे.
१००० किरकोळी पाटिलक्या व से-या व बागा वगैरे.
१५०० दरेकराकडील आहीरवाडी वगैरे.
२५०० चिट्टीमसाला, खंडगुन्हेगारी, कारसाई, व कडबा शिवाय प्रतिनिधीकडील कारसाई तट्टे, भाजी.
------------
१०००००
सदरहूपैकी खर्च अजमास                       रुपये
२५००० दरमहाचा दरमहा दिल्हा राजमंडलचे लोक आ। ४०० रोजमरा.
५००० कारकून दप्तरचे व राजश्री कडील व दोनी वाड्यांकडील.
३६००० राजवाड्यांतील कापड सुद्धां
                १५००० राजश्री
                १०००० श्रीमंत आऊसाहेब
                ८००० उभयतां राण्या २
                         कापड
                 -------------
                ३६०००
४००० खानाजाद व बाइका एकंदर २२५ अंतुश्री
२००० धर्मादाव
                १००० राजश्रीकडील नित्या गळ व मोइनीसुधां
                 ५०० आऊसाहेबाकडे
                 ५०० दोन वाडे मिळोन
                ----------------
                 २०००
३००० वर्षासनें दोन्ही वाडे व राजश्रीकडील व शाहूमहाराज व आईसाहेब व श्रीमंताकडील कारभारी त्र्यंबकराव याजपासून कृष्णराव परियेंत.
-----------------
७५०००
रोजमारा दुमाहीचा दुमाही द्यावाशिवाय श्रीमंतांकडील स्वार १५० आहेत व सरकारचीं मनुष्यें राजमरेचीं आहेत तीं शाहारची रखवाली करतील, स्वार न पाठविले कोठें तरी.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries