Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक २७९
श्री. १७०७ ज्येष्ठ
यादी जनरल बाडम यांसीं सरकारतर्फेनें बोलावें. सु।। सीत समानीन मया व अलफ. कलमें.
फरांसिसांचा व तुमचा बिघाड पेशजीं जाला होता. अलीकडे सलूख जाहला. त्यास, निखालसपणानें बेकिलाफ सलुख चालत आहे की कसें आहे ? सरकारांत फरांसिसांकडील बोलणें, टिपूवर सरकारांतून मसलत जाल्यास आह्मीं हमराहा मदतीस चाकरीबद्दल येण्याचें, लागलें होतें. दोनतीन वेळां त्याजकडोन पैगाम आले. परंतु इंग्रजांशीं व सरकाराशीं निखालस दोस्ती. तेव्हां फरांसिसास सामील आणणें ठीक नव्हे. इंग्रजांशीं दारमदार स्नेहाचे झाले आहेत. त्यांचीच वृद्धि असावी. याजवर नजर देऊन फरांसिसांचे बोलणें सरकारांत पसंद न केलें. हाल्लीं टिपूचे पारिपत्यास सरकारांतून फौजा रा। होणार. तेव्हां फरांसिसांचें बोलणें इकडे सरकारांत नापसंद जाल्यामुळें, कदाचित हिंदुस्थानांत आपला फैलाव ज्याजती व्हावयाउमेदीनें फरांसिसानें टिपूशीं सलूख करून, त्याचे मदतीस सामील होण्याचे ठराऊन, त्याचे मदतीस आल्यास, याचा विचार इंग्रज करितात, हे जनरल यास पुसावें. मसलतीचा विचार थोर, तेव्हां विलायती हुकुमाशिवाय कोणताही मनसबा विचार कसा होतो, असें कदाचित् म्हणंतील. तर, विलायतेस लिहून, तेथें ठराव होऊन तेथील हुकूम यांस येऊन, मसलत करणें, त्यास अवकाश बहूत पाहिजे. आणि इकडे तों मसलत प्राप्त जाहाली. उपेक्षा होऊन अवकाशावर पडिल्यास, पुढे दिवसेंदिवस त्यास भारी पडतें. सरकारांत टिपू सुरळीत वर्तोन सरकारमर्जीप्रमाणें सलूख करून मोकळा जाल्यावर, फरांसीस सामील आहे. त्यापक्षीं मसलत इंग्रजांसच जड पडेल. याचा दूरदेश विचार त्यांचे ध्यानांत येऊन, याचे पैरवीचा मनसबा कसा कायम आहे ? सरकारांत तों इंग्रजांचे दोस्तीचे बद्दल खातर. फरांसिसांचे मसलतीस येण्याचें बोलणें ऐकिलें नाहीं. येविशींचे सविस्तर लिहिल्या अन्वयें जनराल यांसीं बोलोन त्याचें उत्तर काय करितात, तें लेहून पाठवणे.
कलम १
मेस्त्र मालिट मुंबईहून कलकत्याले गेले आहेत. हेच पुण्यास वकिलाचे कामावर कलकत्त्याहून आल्यास, सरकारचे कामाचे उपयोगी पडतील व आह्मांपासोनही साहित्य कामकाजाचें घडेल. यास्तव, सरकारांतून कलकत्यास सूचना मालिटचे रवानगीविषयीं जाल्यास चांगलें, म्हणोन जनराल तुह्मांपाशी बोलले. त्याजवरोन कलकत्यास सरकारांतून पाठविलें आहे कीं कलकत्त्याहून पुण्यास वकील रवाना करणार, त्यास मेस्त्र मालिट वाकब आहेत, तेच आल्यास फार चांगलें. येविशीं तुम्ही बोलावें आणि उत्तर काय तें कळवावें, ह्मणोन पत्र गेलें. याप्रमाणें जनराल यांस सांगितले कलम १