मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक १७९

१६६९ भाद्रपद शुद्ध १४


आज्ञापत्र सेनाधुरंधर विश्वासानिधि राजमान्य राजश्री रघोजी भोंसले सेनासाहेबसुभा, ता मोकदम, मौजे घनवाडी, पा तळेगांव दाहा सहस्रांची, हालीं वस्ती मौजे हिंगणगांव, पा कु-हा, प्रांत व-हाड. सुा समान सबैन मया व अलफहु. मौजे मजकुरीं पळून जाऊन धनोडी मजकुरावर दावादंद कारितोस ह्मणोन हुजूर विदीत जालें. तर, हे गोष्ट कार्या ( स येणार नाहीं ) हल्लीं देखत आज्ञापत्र आपले गांवास उठून येणें. दावादंद न करणें, याजउपर दावादंद केला तरी पारपत्य केलें जाईल. या कामास जासूद पाठविला असे. यासीं मसाला रुा ५ पांच आदा करणें. जाणिजे. छ १३ माहे शाबान. मोर्तबसुद.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries