Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १४४.
पौ अधिक वद्य ४ शुक्रवार
श्री. १६९६ अधिक वैशाख शुद्ध अखेर.
यवतेश्वरी.
श्रीमंत राजश्री बाबूरावजी स्वामींचे सेवेस.-
पो महादाजी कृष्ण गोडबोले वास्तव्य जकातवाडी कृतानेक नमस्कार विनंती येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लेखन केलें पाहिजे. विशेष, वेदशास्त्रसंपन्न राजश्री रघुनाथबावा श्रीं होते. तेथें अन्नशांतीमुळे दोन अडीच सहस्र ब्रह्मस्व जालें. याजमुळें तेथून निघोन वांईसही आले. तेथेंही कांही दिवस होते. परंतु ब्रह्मस्वपरिहार जाहला नाहीं. मग पुणियांत सतरा अठरा महिने तुळशीबागेंत आहेत. त्यास, हा दिवस उछाहाचा आहे. तरी श्रीमंत राजश्री नाना फडणीस यांस निवेदन करून ब्रह्मस्वपरिहाराचें यश आपण घ्यावे. बावांची स्नानसंध्या उपोषणादिक आचरण कोणते प्रकारचें आहें तें सर्व आपणांस विदितच आहे. तेथें विस्तार कां ल्याहावा ? बहुत काय लिहिणें ? लोभ असों दिला पाहिजे. हे विनंती.