Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १४०
पौ अधिक वद्य ४ शुक्रवार
श्री.
१६९६ अधिक वैशाख शुद्ध १३
राजश्री बाबूराव विश्वनाथ वैद्य गोसावी यांसीः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नौ साबाजी भोंसले सेनासाहेबसुभा दंडवत विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जावें. विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन लेखनाभिप्राय कळला. मातुश्री गंगाबाई अधिक वैशाख शुद्ध ७ सप्तमी इंदुवारीं प्रसूत जाहाली. पुत्ररत्न जाहालें, ह्मणोन लिहिलें. त्यास गुरुवारीं प्रातःकाळीं में संतोषाचें वर्तमान राजश्री हरी बल्लाळ यांजकडे आलें. श्रवण होतांच आनंद, श्रुष्ट * भरून उरवरीत जाहाला. त्याचा तपशील काय लिहावा ? उछाव आज दोन तीन दिवस; नौबती, सरबत्ती, यंत्रांचा गजर, व शर्करा लष्करांत वांटिल्या. नबाब निजामुद्दौले आदिकरून समारंभ जाहाला. जगदात्मा कृपावंत होऊन कुलदीप उदय केला. त्यास आयुष्यवृद्धी करो ! सर्वांस आधार : देवानें केला. जगन्निवास पुढें उत्तम उत्तमच करील! येथून दरकूच कार्योद्देशास जात असों. राजश्री नानाजी कृष्ण अद्याप पावले नाहींत. उदयीक येणार, भेटीनंतर कळेल. या छ १२ माहे सफर. बहुत काय लिहिणें? हे विनंती.