Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ७

पो छ १७ जिल्हेज,अर्बा
श्री.
१६८४ माघवद्य ९

राजश्री मोरोजी शिंदे नामजाद तालुके रत्नागिरी गोसावी यांसीः-

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो। माधवराव बल्लाळ प्रधान आशीर्वाद. सु। सलास सितैन मया व अलफ. विसाजी केशव मुकादम, ता फुणगुस, यांणीं हुजूर विदित केलें कीं:-मौजे डावखोल, ता मजकूर, येथील खोतीच्या वतनाचा कजिया पेशजीं मांजरेकर सांवत यांचा व आमचा लागला. त्याचा निवाडा च्यारी दिवाणांत होऊन आह्मीं खरं जाहलों. त्या प्रों कागदपत्र  करावयास हरकी व खर्चर्वेंच जाहला. तो आमच्या भाऊबंदांनी व आह्मीं यथाविभागें पैंका देऊन आपापला विभाग खोतीचा अणभाऊं लागलों. त्या तक्षीमदारांपैकीं रामाजी नारायण मुकादम आपल्या सदरहू विभागाप्रों पैका न देतां खोतीचा उपभोग विभागाप्रमाणें करितों. त्यास पैका देवावयाची आज्ञा जाहली पाहिजे, ह्मणोन, त्यावरून, तुह्मांस हें पत्र सादर केलें असें. तरी सदरहू मजकूर मनास आणून, वाजवी त्याचे विभागास पैसा आला, तो न देतां वांटा खातो, या प्रमाणें असलियास रामजी नारायण यास ताकीद करून विभागा प्रमाणें पैका देवणें, जाणिजे. छ २२ रजब. बहुत काय लिहिणें? लेखनसीमा.