Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक १०

श्री.
१६८५ श्रावण वद्य ११

पोरा श्रावण वद्य १४ मंगळवार सवाप्रहर दिवस.

वेदशास्त्रसंपन्न राजश्री बाळकृष्ण दीक्षित स्वामीचे सेवेसीः-

विद्यार्थी कृष्णराव बल्लाळ सां नमस्कार विनंति उपरी येथील वर्तमान श्रावण वा ११ मुक्काम वरवाडी खुर्द, पो पैठण, जाणून स्वकीय लेखन केलें पाहिजे. विशेष. कृपा करून पत्र पा तें पावलें. मोंगलाई लढाई होऊन मोंगलांचा पराभव जाहल्याचा संतोष जाहला, ह्मणून विस्तारें लिहिलें. ऐसियास, सर्व आपले व देवब्राह्मणांचे आशीर्वादाचे फळ! पुढेहि जें होणं तेंही आपलेंच कृपेनें होईल. भेडालें व काठीपिंपळगावाविषयीं लिा. ऐसीयासीं प्रस्तुत गांडापुरास कोण कमावीसदार नेमिला नाहीं. त्रिंबकपंत तूर्त मोंगलांचे अमिलास धरावयाकरितां पा होते. त्याणीं त्याचें पारपत्य केलें. मार्निलेस बेलाऊं गेलें आहे. तेहि लौकरीच येतील. आणि मार्निलेसही पत्र रा बापूचे लिहून पाठविलें आहे. तें त्यास प्रविष्ट करावें. ह्मणजे ते आपले गांवास उपसर्ग लागों देणार नाहीं. श्रीमंताचहि पत्र स्वामीस आहे. त्यांत श्रीमंताच्या हातच्या वळीं आहेत. बहुत काय लिहिणें? लोभ असो दिजे. हे विनंति.