Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक १२२

श्री.
पौ चैत्र वद्य ११ गुरुवार,
१६९६ चैत्र वद्य ६

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री बाबूरावजी स्वामीचे सेवेसीं:-

पोष्य कृष्णराव नारायण सां नमस्कार विनंती उपरी येथील कुशल ता चैत्र वद्य षष्ठी जाणोन मुा लष्कर नजीक मोहळ जाणोन स्वकीय कुशल लेखन करीत असिलें पाहिजे. विशेष आपणाकडून शुद्ध एकादसी व पौर्णिमेची पत्रें आलीं ती पावोन सविस्तर मजकूर कळला. इकडील मजकूर तर तपसीलवार तीर्थरूपांचे पत्रावरून व राजश्री लक्ष्मणपंत यांणीं लिायावरून लिहून कळेल. एका दोहों दिवसांनी सड्या फौजा होणार, मागाहून तपसिलवार लिहून पाठवूं. त्या सैन्यांतून राजश्री सदाशिव हरी आले आहेत. कांहीं सूत्रही आंतून आहे. कसें काय आहे, पुर्तेपणीं कळलें ह्मणजे लिहून पाठवूं. कसेंही सूत्र आलें तरी इकडील मिजाज कायम आहे. चिंता नाहीं. राजश्री हरीपंत तात्याकडे आह्मीं व राजश्री दादा जात असतों. बहुत ममता उत्तम प्रकारें करितात. तात्यांचे साधन बरें राखिलें आहे. चिंता न करावी. पत्रें वरचेवर पा असावीं. घोड्याविशीं लिा त्यास, एक घोडा तुरकी, फारच चांगला, गुदस्तां यांनीं अडीच हजार रुपयांस घेतला होता, तो तयार आहे. परंतु एकच घोडा पाठविल्यास राजश्री बापूंसही पा पाहिजे. दुसरा तूर्त पाठविण्यास सोय पडत नाहीं. याजकरितां न पाठविलें. तूर्त विकतही घेईन ह्मटल्यास मिळत नाही. व ऐवजही नक्त द्यावयास नाहीं. याजकरितां पाठवायास आजपावेतों अनमान जाहला. यजमानाचें मानस कीं, पाठवणें. तेव्हां दोन पा. त्यास दुस-याची तरी तूर्त सोय पडत नाहीं. याजकरितां तेथून राऊत कोणी येईसें असल्यास त्याजबराबर एकच पा ह्मणून लिा तरी एकच पा देतों. घोडा आहे हा फार चांगला आहे. हा राजश्री नानांचे मर्जीजोगीच आहे. येमनीपेक्षां अधिक चालणारा आहे. पाहिल्यानंतर कळेल. राणी मल्हार[र] पानशे येथें येणार ह्मणून वर्तमान ऐकितों. त्यांजबरोबर राऊत येऊन माघारे जातील त्यांजबराबर पत्र देतों. बहुत काय लिहिणें? लोभ करावा. हे विनंती.