Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ११७

श्री.
पौ चैत्र वा २ मंगळवार,
१६९६ चैत्रशुद्ध १४

अपत्यें तात्यानें चरणावर मस्तक ठेवून सां नमस्कार विज्ञापना. ता चैत्र शुध १४ रविवासर मुक्काम नजीक नाझरें वर्तमान यथास्थित असे. विशेष, श्रीमंतांची व रा मामांची गांठ काल मंदवारी दोन प्रहरां पडली. होणाराप्रों उतावळीनें हा प्रकार जाहला. सविस्तर वृत्त राजश्री हरपिंत तात्यांनीं लिहिलें आहे त्यावरोन कळेल. श्रीमंत राजश्री साबाजी भोंसले, सेनासाहेबसुभा, मंदवारीं वीस कोस नाझरेयानजीक माणेवर संध्याकाळच्या साहा घटका दिवसास आले. मामांनी माणेच्या व भिंवरेच्या संगमीं मुकाम करावा तो न केला. याजकरितां येथें मुक्काम केला. तों सूर्यास्तीं लढाई होऊन फौजा निघाल्याचें वर्तमान आले. तेव्हां मुस्तकीम होऊन राहिले. रात्रौ मामाकडील बुणगे वगैरे आले. ते आपणाजवळ उतरविले. आज तात्या व सर्व सरदार येथें आले. फौजेजवळ फौजेचा मुकाम जाहला. नबाबाकडे रात्रौ दोन तीन पत्रें पाठविली. त्यांनी अकरा कोशांचे कूच केलें. चौ घटकांनी एथें येतील उपरान्त सर्व एकत्र होऊन उदईक श्रीमंताच्या तोंडावर जातील. मामांनी उतावळी केली. इतक्यानें त्यास यश आलें. कांहीं लढाई चांगली जाहलीच नाहीं. ईश्वरीकृपेनें चिंता नाही. सर्व गोष्टी मनोदयानुरूपच घडतील. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दिजे. हे विज्ञापना.