Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १२३.
श्री.
पौ अधिक वैशाख शुा. ५ शुक्रवार,
१६९६ चैत्र वद्य ८.
राजश्री नानाजी कृष्ण व राजश्री बाबूराव विश्वनाथ गोसावी यांसीः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो साबाजी भोंसले सेनासाहेब सुभा दंडवत विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जावें. विशेष. सांडणीस्वाराबराबर छ १७ मोहरमचें पत्र पाठविलें तें छ २० मोहरमीं पावलें. लेखनार्थ कळला. राजश्री सखारामपंत बापू व राजश्री बाळाजीपंत नाना यांची पत्रें पाठविलीं ते पावलीं. ऐशीयासी, राजश्री रघुनाथरावदादा यांणी मामास हस्तगत करून सीनेच्या पाण्यानें लांब मजली करून जात आहेत. काल त्यांचा आमचा सोळा कोसांचा तफावत होता. भारी कारखाना परांडेयांत ठेवावयाबद्दल आमचा मुक्काम नबाबांनीं करविला. याउपरी नवाबांनी जरीदे दाहा बारा कोसांच्या मजला करून मागें यावें आणि आह्मीं व राजश्री हरीपंत व राजश्री वामनराव व रास्ते वगैरे सरदार जाऊन गांठ घालावी; अटकून पाडावे; तोफा टाकून झुंजास आले तरी झुंजावें; ऐसा निश्चय ठरविला आहे. राजश्री भवानीराव प्रतिनिधी काल येऊन दाखल जाहाले. हें सविस्तर वर्तमान राजश्री हरिपंत व राजश्री कृष्णराव यांण लिा आहे. त्याजवरून कळेल, राजश्री बापू व नाना यांस लिा आहे. तिकडूनही कित्तेकविशीं साधन प्रकार घडावा. राजश्री मोरोपंतदादा यांसीं इकइन पत्र बहुत दिवस जात नव्हतें, आणि त्याजकडूनही पत्र येत नाहीं, येविशींचा मजकूर तुह्मांस लिहिला होता. त्याचें उत्तर आलें. त्यास, हल्लीं पत्र लिा। आहे. प्रविष्ट करून उत्तर पाठवावें. वरकड तुह्मांस ल्याहावें ऐसें नाहीं, वरचेवर पत्रें येत जावीं. रा छ २२ माहे मोहरम. कित्येक तेथील ममतेचा वगैरे मजकुर राजश्री तात्यांचे पत्रीं लिा त्यांणीं उमजाविलें. तुह्मीं उभयतां प्रसंगी आहां. तेथें आह्मींच असो. इकडिल संशय किमपिनसावा. लक्ष दुसरें होणारच नाहीं. तेथील हे निशा आपली येऊन, त्यांची करावी. बहूत काय लिहिणें हे विनंती. मोर्तबसुद.