Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ११८
श्री.
१६९६ चैत्र वद्य ६
आशीर्वाद उपरी येथील क्षेम ता चैत्र वा ६ मंदवासर मुकाम मोहोल क्षेम असों. विशेष. आपण पत्रें शुद्ध एकादशीचीं व पौर्णिमेचीं पाठविलीं ती काल परवां पावलीं. लिहिलें वर्तमान कळलें. मुकारनामक वे मातुश्रीच्या सूत्राचा प्रकार लिहिला तो कळला. येथें सूत्रें पाटणकर वगैरे यांचे विद्यमानें आहेत. ह्मणून बातमी आली आहे. त्याचा शोध करून वरचेवर बंदोबस्त करीत जावा. म्हणोन लिहिलें. त्यास सूत्रें बहुत. नानाप्रकारे येतात. परंतु यांची कायम मिजाज आहे. आणि पुर्तेपणीं समजलें आहे कीं, क्षणभंगुर कारभार; व आह्मीही वरचेवर सावध करीतच आहों. तेणेंकरून सूत्रें लागत नाहीं व समजलेंही आहे कीं जर करितां अविलंबीली मसलत सिद्धीस जात नाहीं, तरी परिणाम लागत नाहीं. प्राण वांचणें होणें कठीण. अपकीर्तीस पात्र याजकरितां कोणेंही प्रकारें मसलत सिद्धीस जांवी हाच मनोमानसीं भाव आहे. दुसरा अर्थं किमपि नाहीं. यांचा कारकून तिकडे गेला म्हणून आइाकतों, ह्मणून लिहिले. त्यास, यांजकडून कोणी तिकडे गेला नाहीं व सूत्रे येतात त्यांसही साफ उत्तरें देतात. लाऊन ठेवीत नाहींत. इकडील बंदोबस्त आहेच. गुंता नाहीं. राजश्री मामांनीं उतावळी करून यश त्यांस दिलें. ईश्वरास करणें ! उपाय नाहीं! एक दिवस गांठ घातली नसती तर दुसरे दिवशीं हे पोंचले असते. मग गांठ घातल्यास चिंता नव्हती. व दुसरें, निजामअल्ली यांचा जांवई बसालतजंग याचा लेंक आदवानी कडून नबाबाकडे येत असतां मोहलेवर आला. श्रीमंतांस बातमी लागली. त्यांजवर धांवले. हे वर्तमान नवाबास कळलें, लांब मजल केली. जाऊन आटोपावें तों त्यांच्याने दम धरवला नाहीं. एक दिवस झुंजला. निदानीं हस्तगत जाहला. हेंहि काम वाईट जाहलें. त्याजवर गुरुवारीं जाबीतजंग, धौसे, राजश्री हरीपंत तात्याचे डेरेयास आले होते. सरदार इकडील सर्व एकत्र होऊन निश्चय ठरविला जे, मामा गेले ह्मणोन कांहीं गेलें नाहीं. अविलंबिली मसलत सिद्धीस न्यावीच न्यावी. एतद्वविषयीं इमानप्रमाणपूर्वक भाषणें परस्परें होऊन मुकाम मजकुरीं आले. आज कूच होऊन पुढें जात आहेत. श्रीमंतांनीं काल कूच करून मोड्याहून पुढें गेले. यांस त्यांस वीसा कोसांची तफावत आहे. गांठ लवकरच पडावी, ऐसें आहे. बहुत काय लिहिणें ? लोभ कीजे हे आशिर्वाद.