Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ११५
श्री.
पौ चैत्र वा २ मंगळवार,
१६९६ चैत्र शुद्ध १५
राजश्री नानाजी कृष्ण जोशी व बापूराव वैद्य गोसावी यांसीः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो साबाजी भोंसले सेनासाहेबसुभा दंडवत विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जावें. विशेष. राजश्री रघुनाथराव दादा मागें पंढरपुरच्या सुमारें चालिले ह्मणोन त्रिंबकराव मामा सडे होऊन त्यांजमागें गेले. पंधराची संप. मुसलमान लोकांचा गुंता. याजबद्दल एक दिवस आह्मी मागे राहिलों, छ १३ मोहरम शनिवारीं वेणूनाद गोपाळपुरावर दादांचा मुकाम होता. कासेगांवीं सेनाधुरंधराची फौज होती. मामा तेथें गेले. दादा तोफखाना व फौजसुद्धा कासेगांवास आले. इकडून उतावळी जाहली. सारांश, जुझाचा प्रसंग न बनला. मामा जखमी पाडाऊ गेले, आह्मी वास.कोस मजल करून माणेवर नाझरे याखालीं दोन कोस मुकाम केला. तों संध्याकाळीं हें वर्तमान व फौज व राजश्री हरीपंत तात्या आले. एक मामा मात्र निशाण हत्ती वगैरे समेत गेले. वरकड वामनराव व रास्ते, नारोशंकर यांचें पथक व शिवराम विठल अवत्र फौज आह्मांजवळ आली. नबाबही सा चौ घटकांनी येथें येत आहेत. दादांनी आज मुकाम करावा. वरकड देव सर्व घडवील, राजश्री बापू व नाना यासीं आपण खातरजमा करून सांगावें. आह्मींही त्यांस लिहिलें आहे. व रा हरीपंत तात्या व तात्या यांणीं लिा आहे. त्याजवरून कळेल, चिंता न करावी. मामा कांहीं घेऊन गेले नाहींत. रा छ १४ मोहरम. बहुत काय लिहिणें ? हे विनंती. मोर्तबसूद.