Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ११२

श्री
१६९६ चैत्र शुद्ध ९

अपत्ये तात्याने दोनी कर जोडून सां नमस्कार, विज्ञापना. राजश्री सेनासाहेबसुभा यांनीं आह्मांस साल गुा चे ऐवजीं खर्चाबद्दल तेथून रुा पांच हजार साडेआठशांची चिठी देविली आहे. त्यावरून राजश्री बाळाजी गणेश यांचे नांवाची चिठी पा आहे. तर, सदरहू ऐवज घ्यावा. एकूण ऐवज सारा आठावीस हजार साडे आठशांच्या चिठ्या जाहल्या. येणेंप्रमाणे ऐवज दिलाच असेल. व हालींहि लिहिल्याप्रमाणें द्यावा. हा अर्ज कर्ज दाखल द्यावासें असल्यास लिा पाठवावें. त्याचे नांवचें खत लिा पा द्यावें. कदाचित् कर्ज नच द्यावेंसें असलें, तरी ऐवज पुढें सफरचें ऐवज घ्यावयास येईल. सारांश, चिठ्या माघाया न फिरत तो अर्थ करावा. राजश्री बाबूरावजीची यादी कराराची तैनात रुपये पंधरा हजार रुपयांची करून घेतली आहे. देणे मात्र व्हायचे आहे. आज करून घेतो. वकिलियाचे तर्फेची त्या दरबारी करार जाहली आहे. पूर्वीचा दाखला नाहीं. सांप्रत उपयोगी पडिलें सा, ह्मणून यादी करून घेतली आहे. सदरहू ऐवजाचा सरंजाम लाऊन घ्यावा.. याप्रमाणे करार आहे. कळावे. यादीची नकलही पाठविली आहे. कळावे. बहुत काय लिहिणे ? पोद्दारीचें भाषणांत आले आहे. ऐवज आपणाकडे घेऊन चिट्या आपणावर करून घेणे ठीक नाहीं. याजवरी पोद्दारी ऐवज मात्र कराराप्रा घेतों. बहुत काय लिहिणे ? हे विज्ञापना.