Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ९८.

श्री
पो छ २ माहे मोहरम
१५ फाल्गुन वद्य ११

आशीर्वाद उपरी येथील क्षेम ता छ २४ जिल्हेज भौमवार पावेंतों लष्करांत सुखरूप असो. विशेष, इकडील वर्तमान तरीः रुकनुद्दौलाच्या भेटीचा मार पेशजीं लिहिलाच आहे. मंदवासरीं बंदगानअल्लीच्या भेटी जाहल्या. भेटीचे समईं मामांनीं सेनासाहेबमुभा यांजकडील सरदार व लोक भेटीस न आणावे ह्मणोन सांगितलें आणि आपले सरदार व लोक भेटीस बहुत नेले. असो. ते भेटी झाल्यानंतर सेनासाहेबसुभा यांस टाकून खलबत मामांनी करणें उत्तम नाहीं. पहिल्यापासोन ऐसें जाहलें नाहीं. ऐसें असोन, तेथे मामांनी उपक्रम केला. तेव्हां यांनीं म्हटलें कीं, आह्मांस निरोप देणें, आह्मी डेरेयास जातों, तुर्ह्मी खलबत करावें. ऐसें ह्मणोन नबाबाचा निरोप घेऊन आले, यांस तर वाईट वाटलें व नबाबास व रुकनतद्दौला यांसहि ते गोष्ट मानली नाहीं. यांनीं, मसलतीवर नजर, या करितां मर्जी राक्षतात. परंतु, समयीं मामा मानभंग या रीतीनें करतात. 'आपण लिहिलें कीं, मजी सांभाळावी. त्यास. मर्जी सांभाळण्यास कसूर करीत नाहींत. परंतु, समयीं ऐसें परस्थळीं करितात. हें उचित कीं काय ? तेहि हे मोजीत नाहीं. परंतु विरुद्ध दिसतें. यास काय करावें? खर्चाचा प्रकार तरीः आपण लिहिलें कीं, मामाकडे लाख रुपये पाठविले आहेत, ते देतील न देतील तरी तेथें राहून पाठवणें, भरती करून पाठवूं. ह्मणोन लिहिलें. त्यास, मामास नित्य उठोन खर्चास मागतात. दोन चार रुपयांचे निर्खे देतात. त्याचे पावणेतीन रुा घडतात, तेहि एकदां देत नाहींत. हजार दोन हजार ऐसे देतात. त्याणे त्यांचे कांहीं होत नाहीं. यांस जर करतां पांचलक्ष रुा तूर्त मिळतात, तरी दोन महिने निसूर राहून मसलतीवर कायम राहतील. दोन गोष्टी अडचणीच्या संभाळत नाहीं. रुबकार लढाई प्राप्त. या दिवसांत पोटाची रड नसावी व फंद नसावा. त्यास पोटास नाहीं; व दर्याबाई मामांनीं बगलेस मारली. यामुळे बखेडे होतात. यास, कोठपर्यंत सांभाळावें? मामा तरी परिछिन्न घातावर. त्यास साह्य देवजीपंत. युक्तीप्रयुक्तीने पेंच पडोत यांची कमी पडावी, राजश्री बापूंची व नानांची मर्जी यांजवर कडवी व्हावी, हें ध्यान आहे! हे तर आपल्याकडून बहुताप्रकारें सांभाळितात. मानअपमान ध्यानांत ने आणितां, भामांचे मर्जीप्रमाणें वर्तणूक करून, समयीं काम करून दाखवावें, आणि आपले मनोरथ सिद्धीस जावे. त्यास, या गोष्टीस मुख्यत्वें करून द्रव्य अनुकूलता पाहिजे. लोकांस पोटास मिळालें ह्मणजे मग हे कांहीं भीत नाहींत. त्यास श्रीमंत राजश्री नानांस विनंती करावी कीं, हे सरदारी आपली, पदरी पडीलयांचें उणें ते आपणास पूर्ण करावे लागेल. याजकरितां सरकारांतून अगर हरकैसेकरून यांस पांच लक्ष रु। कर्ज मेळवून द्यावे. आणि यांची पोटाची संस्था करावी. मसलत सिद्धिस गेल्यावर कर्जाच्या ऐवजास मुलूख परगणे लाऊन देतात. रु। व्याज सुद्धां आदीं देतील. आज सनदा करून देतात. परंतु हा समय आहे. लढाईचें काम. या दिवसांत पोटास न मिळे तेव्हां लोक चाकरी बेउजूर कैसी करितील ! आणि त्यास, बेमुरवत, अर्धरात्रीं प्रसंग पडल्या जीन ठेवा असें कैसें ह्मणावें ? याजकरितां कोणेंहि प्रकारें पांच लक्षांची तरतूद जाहली पाहिजे दर्याबाईस खर्चास मामा देतात. त्यांच्या लष्करांत व मामांच्या अविंधांच्या लष्करांत पोटाचें धरणें नाहीं. आणि यांचे लष्करांत पोटाचें संकटीं! या अर्थी बहुत संकटांत आहेत. हे संकट श्रीमंत राजश्री नाना दूर करतील तर होईल. आणख्यांच्यानें होत नाहीं. याजकरितां सविस्तरें ल्याहावयाची आज्ञा जाहली. त्यास, त्यांचा अर्थ ध्यानांत आणून पुर्तेपणीं विनंती करून माणसांची बेगमी करून देऊन लिहून पाठवावें. मागाहून एक दो रोजां राऊत व गणेबास ऐवजाकरितां पाठवितों. बातमीचें वर्तमान सविस्तर राजश्री भावानी शिवराम यांनी लिा आहे. कळेल, बहुत काय लिहिणें? लोभ कीजे हे आशिर्वाद.