Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ९५
श्री.
१६९५ फाल्गुन वद्य ५
आशिर्वाद उपरी. मुख्याकडून आज चार दिवसांत चार अनुसंधानें चौघांचे हातून याजकडे आलीं. त्यातील अर्थ जे, प्रथम सेनाखासखेल हें पद देतों, तुमच्या सरंजामाइतका सरंजाम देतों, आणि दोन किल्ले मातबर देतों, व दर्म्यानें मातबर माणूस देतों, आणि तुह्मी यावें. हें अनुसंधान योसिता व शिशु येथें आहेत त्यांचे विद्यमानेंच यांण त्याणी एक होऊन जावें, ऐसें प्रथम आलें. याणी साफ उत्तर दिलें. त्यावर दुसरें सूत्र आलें की, तुमचें पद तुह्मांस देतों, आणखी दोन किल्ले व जहागीर देतों. तेहि यांनी अमान्य केलें. त्याजवर, तिसरें सूत्र आलें कीं, जे जाहलें तें समर्थ, तुमचे मुद्दई आह्माजवळ आहेत, यामुळें तुह्मांस विश्वास पटत नाहीं, तरी त्यास ज्ञानकंटी बसवून पाहिजे तरी तुह्मांकडे पाठवितों. त्यानंतर चवथे सूत्र आले कीं, आपण एकले तुमच्या डे-यांत येऊन बसतों, तुमच्या वंशजपणास उत्तम दिसेल तें करावें; तुह्मी ह्मणाल कीं, राज्य एकीकडे व आह्मी एकीकहै कैसें बनेल, तरी तुह्मांस सोबती आणखी करून देतों, मुद्दईयाचे खावंद तुह्मी, व्हावें म्हणजे चिंता नाहीं. याणीं नावें पुसिलीं. त्याणी आपले सरदार मातबर यांची नांवें घेतात. वृध नकार-नामक सकार-नामक येथें आहेत. हे व मुद्दई यांची चमू यांची नांवें घेतलीं. तेव्हां त्यासहि संशय प्राप्त जाहला, परंतु परस्परें विक्षेप वाढावें या अर्थी नांवे घेतात किंवा कसें, हेंहि समजत नाहीं. यांणीं उत्तर केलें कीं, तुह्मी गोष्टी सांगतां त्या आमच्या निदर्शनास कशा येतील, व तुह्मी ज्याचे अभिमान धरिलें त्यांच्या गोष्टी तुह्मीच ऐशा सांगतां तेव्हां पुढें परिणाम कैसा ? ऐसीं याजकडे अनुसंधाने येतात. यांचा आमचा प्रकार दुसरो नाही, यामुळें आम्हांस कळतात. त्यास, याप्रो सर्वत्राकडेच असतील, ऐसें वाटतें. राजश्री मामांनींहि बोलण्यांत आणिलें कीं, श्रीमंतांची सूत्रें येतात यामुळें कोणी कच्चपक्के होतील कीं हे काय कळत नाहीं, खुद्द आह्माकडेच नित्य सूत्रें येतात, ऐसींच सर्वांकडे येत असतील. यांनी उत्तर केलें की, ज्यांच्या वंशांत खतरा असेल त्याचें कळेना, एक बाप असेल त्याजकडून तरी दुसरी गोष्ट घडणार नाहीं, ऐसें वाटतें. तेव्हां मामा उगेच राहिले. त्यास, त्यांचा खंबीरदार दुसरा नाहीं, परंतु फौजेस पोटास नाहीं यामुळे सर्व मनुष्य मात्र आजुर्दे आहे व मामाचें भाषण रुक्ष विक्षेपास कारण होतें. मामा यासींच रुक्ष भाषण करितात, ऐसें नाहीं. त्यास सल्लागार दकारपूर्वक. त्यास कोणेहि प्रकारे हितशत्रुत्व करणें प्राप्त. मामास मात्र आप्त वाटतात. अविंधहि फार अजुर्दा आहे. पदोपदीं भाषणांत नाशितात. व सर्व अध्यकता आपणाकडे असावी वरकडाकडे कोणाचें लक्ष नसावें, एतदविषयी प्रेत्नही केले आणि करितात. अविंधानें तर सुबकपणा ठराविला. त्याचे मानस कीं, राजश्री बापूनीं व नानानीं फौजेंत यावें तरच ठीक पडेल, एरवीं ठीक पडणार नाहीं. येविसीं त्यांचीं व जिवाजी रघुनाथ यांची पत्रेंहि गेलीं असतील. परंतु उघड लिहिलें न लिहिलें हें न कळलें. सारांश, मसलत थोर, या दिवसांत सर्वांचें मनोधारण रक्षून दाबहि राखावा तरच उत्तम. नाहीं तरी कल खाईल. मग सुधरणार नाहीं. पिघी अविंधानें लुटली. ब्राह्मण व मराठे यांचे कबिले तेथें होते त्यांच्या अबरू गेल्या. यामुळें मराठे अजुर्दा फार आहेत. अविंधांकडून सहजांत जाहलें, जाणोन न जाहलें, परंतु वाईट फारच जाहलें. त्यामुळें मराठे यांस विक्षेप जाहला. जे गनिमाई जबरेंत आली, यामुळे या गोष्टी घडल्या.' राजा बाहादर याचे वेळेस ऐसेच विक्षेप वाढले. त्यास, हें नसावें. हें पत्र वाचून फाडून टाकावें. यांतील भावार्थ मात्र यजमानाम समजावा. हरवख्त सूचना असावी है आशिर्वाद.
आज श्रीमंतांकडून कराराची यादी व पत्र यांस आलें. त्यांत लिहिले आहे कीं, जानोजी भोंसले यांच्या तहाप्रों तुमचे तुह्मांकडे करार आहे. मुधोजी भोंसले, जानोजी भों यांचे समई चंद्रपूर मात्र घेऊन ताबेदारी करीत होते, त्याप्रों करतील. याप्रों पत्र व यादी आलीं, टोपीवाले यांचीच पाठविलीं. नामनिर्देस उच्चार न करावा. परंतु वर्तमान असें आहे. यांस नकल दाखविली. ती त्यांनी आपणाजवळ घेतली आहे. परंतु यास पुर्तेपणीं समजलें आहे. एक दोन गृहस्थहि यास बोध करीत होते. परंतु यांणीं ते गोष्ट अमान्य केली जे, आपणास हे गोष्ट उचित नाहीं, प्राणहि जाऊ, परंतु विपरीत गोष्ट घडणार नाहीं, आमचे वृत्तीस क्षणक्षणा पालट न करावा. ऐसें उत्तर साफ केलें. परंतु ऐसे फंद आहेत ! यांत सावधता असावी. उभयतांनी यावें. हे मोठी सला आहे. हे आशिर्वाद.