Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १०१
श्री.
पौ छ २ मोहरम.
१६९६ चैत्रशुद्ध ३.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री बाबूरावजी स्वामींचे सेवेसीः-
सेवक कृष्णराव नारायण जोसी कृतानेक साष्टांग नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहित असावें. विशेष. इकडील वर्तमान तरी अलाहिदा पत्रीं लिा त्यावरून कळों येईल. सारांश, यांची खर्चाची बेजमी उत्तम रीतीची करून दिल्ही पेा. त्याशिवाय आजपावेतों श्रम केले ते व्यर्थ होतात. तरी चित्तावर धरून अगत्य कार्य केलें पाहिजे. येथें नानांनी किंवा बापूनीं यावें. त्याखेरीज केवळ रा मामांशींच संबंध असलिया उत्तम नाहीं. येविशींचे सविस्तर अर्थ पुर्ते मनन करून, काय विचार करणें तो करावा. आह्मांस सुचलें तें आह्मी लिहिलें आहे. कळावें. बहुत काय लिहिणे ? लोभ करीत असावा हे विनंती.
राजश्री भवानी शिवराम यांनी दोन पुरवण्या * वर्तमानाच्या वगैरे बंद सात, लिा आहेत. ते अक्षरशाहा वाचून पाहून करणें तें करावें. हे विनंती.