Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

संस्कृत भाषेचा उलगडा

६ अति जुनाट वैदिकभाषेत स् चा उच्चार -ह् सारखा कंठ्य होत असे म्हणून वर सांगितले . या अति जुनाट -ह चा पाणिनीयकाली व वैदिककालीं र झाला. परंतु हा -ह् अत्यंत लुप्त झाला नाही. पदांती पाणिनीयकाली हा ऐकू येत असे. पाणिनीने ससजुषी रु: या सूत्रात पदांतीच्या स् चा र होतो म्हणून सांगितले आहे. स् चा र होणे हा आपल्याला चमत्कार वाटतो. परंतु पाणिनीच्या या र् चा उच्चार -ह् होता हे लक्षात घेतले म्हणजे हा चमत्कारिकपणा वाटत नाहीसा होतो. -ह् तील ह् वर जास्त जोर दिला म्हणजे -ह् ह च्या किंवा उपसर्जनी याच्यासारखा भासतो, आणि र् वर जास्त जोर दिला म्हणजे -ह् रच्यासारखा भासतो. स् चा उपसर्जनीय होतो व स् चा र् होतो. हे जे दोन नियम पाणिनीने दिले त्याचे कारण -ह् चे हे दोन उच्चार होत. येणेप्रमाणे रामस्पासून दोन रूपे होत, राम: किंवा रामह् आणि राम-ह् किंवा रामर.