Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

प्रस्तावना 

खैल म्हणजे घोडेस्वाराची पलटण, खास म्हणजे स्वतःची, व सेना म्हणजे फौज मिळून राजाच्या स्वतःच्या घोडेस्वारांच्या पलटणाचा मुख्य असा ह्या शब्दाचा खरा अर्थ आहे हा शब्द सस्कृत आहे असे डफ समजतो परंतु हा शब्द मिश्र आहे. गायकवाडांना हीं पदवी मिळण्यापूर्वी ती इतर कित्येकांना मिळाली होती, हें ह्या पत्रावरून स्पष्ट होते १७१३च्या नोव्हेंबरांत परशराम त्रिंबक प्रतिनिधि कोल्हापूरच्या शिवाजीला जाऊन मिळाला होता असे लेखांक २३९ वरून दिसते ह्याच लेखांवरून कोल्हापूरचा शिवाजी १७१२ त वारला नसावा असा सशय येतो लेखांक २३४ व २३८ वरून परशराम त्रिंबक प्रतिनिधि शाहू किंवा शिवाजी ह्या दोघांकडे नसून १७०८ त कैदेंत होता असें ठरते लेखांक २३८ त वर्णिलेला 'कदीम राज्यांत बहुत कष्टमेहनत करणारा सुंदर तुकदेव' कोण होता व त्याने कामगि-या काय केल्या ह्याचा पत्ता अद्याप लागला नाही लेखांक ५६ त राजारामानें आपल्या नांवापुढे छत्रपति हा शब्द लावला आहे. लेखांक ६४ त १७१० पर्यंतचे शाहूचे कांही मुकाम दिले आहेत १७०७ च्या मेंत शाहू घोडनदीजवळ तुळपुरास होता. १७०८ च्या जानेवारीत साता-यास, पुढें पन्हाळ्यास, नंतर पंचगंगेवर, नंतर रांगण्यास, पुढें वर्षभर म्हणजे १७०९ च्या मेपर्यंत कोल्हापूरप्रांतीं छावणींत, १७०९ च्या मेंत पुरंधरास (लेखांक ६२), व पुढे १७१० त वंदनगडास शाहू होता. १७०६ त वाईप्रांत मराठ्यांच्या हातीं आला असें लेखांक १०१ वरून समजतें सय्यदाशीं तह बाळाजी विश्वनाथाने १७१८ च्या आगस्टापूर्वी केला असे लेखांक ९९ व १०० यावरून ठरते लेखांक १०९ तील पोवाडा १७२५/१७२६ तील कर्नाटकातील स्वारीच्या सुखाचे वर्णन करतो. लेखांक १३४ वरून १७०४ त जावलीप्रांत मराठ्याकडे होता. असे नानाप्रकारचे उल्लेख ह्या खंडातील ५५४ लेखांकांत आले आहेत. ते शोधक व जिज्ञासू अशा इतिहासकाराला मराठ्यांच्या इतिहासाच्या रचनेस अत्यंत उपयोगी पडतील त्या सर्वांचा निर्देश येथें करूं गेल्यास फारच विस्तार होईल. सबब प्रस्तुत प्रस्तावनेंत त्यांपैकी कांहींचाच तेवढा परिचय वाचकास करून देऊन, सगतवार अशी जी ब्रह्मेंद्रस्वामींचीं व कायगांवकर दक्षितांचीं पत्रें, त्यापासून इतिहासरचनेस काय उपयोग झाला ते सांगतो.