Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
प्रस्तावना
५ सभाजींच्या कारकीर्दीत कान्होजी आंग्रे फिरते आरमार घेऊन कोंकण किना-याचा बंदोबस्त करीत होता, असा उल्लेख चेऊलच्या बखरींत सापडतो. म्हणजे इ. स. १६८० पासून १६८९ पर्यंतच्या कालांत कान्होजी उदयास येत चालला होता असें दिसतें. १६८० पूर्वी कान्होजी शिवाजीच्या आरमारांत असला पाहिजे हैं उघड आहे सभाजीच्या वेळीं माणकोजी मराठे, उदाजी पडवळ, सुभानजी खराटे व भिवाजी गुजर, खांदेरी, सागरगड, राजकोट व कुलाबा ह्या चार बंदरी किल्ल्यावर अंमलदार होते. बंदरी किल्ल्यावरील अंमलदार आरमारांतील सरदार असलेच पाहिजेत. कान्होजी आंग्र्याकडे ह्यावेळी कोणता बंदरी किल्ला होता तें समजत नाहीं.
१६८९ त सभाजीचा वध झाल्यावर कोंकणपट्टीतील बराच भाग अवरंगझेबाच्या ताब्यात गेला, परंतु मराठ्यांकडेहि थोडाथोडका भाग राहिला असें नाहीं. १६८९ नंतर माणकोजी मराठे, उदाजी पडवळ, व सुभानजी खराटे आपले अंमल सोडून प्रबळगडास गेले. त्यांच्या जागीं भिवजी गुजर व कान्होजी आंग्रे हे दोघे राहिले. मुख्य सत्ता उध्वस्त झाली असतां स्वतःच्या कर्तबगारीनें शत्रूला तोंड देणा-या अनेक मराठा सरदारांपैकी कान्होजी असल्यामुळें, त्याला उदयास येण्यास ही वेळ उत्तमोत्तम मिळाली. राजकोट, सागरगड व पाली ह्या स्थलीं मोंगलांचा अंमल बसला, व कुलाबा, खांदेरी व उंदेरी येथे मराठ्यांनीं आपला तळ दिला दुतर्फा अंमल सुरू झाला. शके १६११ त लढाई होऊन व १६१३ त ह्या दोन्ही सत्ताधा-यांमध्ये तह होऊन दुतर्फा अंमल कायम झाला. ह्या दुतर्फा अंमलासबंधाचें भांडण म्हणजेच मराठे व शिंद्दी यांच्यामधील भांडण होय. शिद्याला दिल्लीच्या पातशहाचें जोपर्यंत पाठबळ होतें, तोपर्यंत मराठ्यांना तो फारसा जुमानीत नसे. इ. स. १७०० च्या पुढे दिल्लीच्या पातशहाचा जोर कमी कमी होत गेला व शिद्दी कोंकणपट्टींत एकटाच राहिला. तेव्हांपासून शिंद्याची सत्ता क्षीण होत होत १७३७ त ती अर्धमेली झाली व १७५९ त केवळ धुगधुगी धरून राहिली. १६९८ त कान्होजी आंग्र्यांचें व शिंद्याचें मोठं कडाक्याचें युद्ध झाले. त्यापुढे १७१३ पर्यंत विशेष काहीं नमूद करून ठेविण्यासारखें कोठें लिहिलेलें आढळत नाहीं. १७१३ पर्यंत आंग्रे ताराबाईच्या पक्षाला चिकटून होता. परंतु शिंद्याशीं युद्ध सुरू झाल्यावर शाहूच्या पक्षाला येऊन मिळणें त्याला सोईचे दिसलें. पुढें आंग्र्यांचा व शिंद्दयाचा १७१५ त बाळाजी विश्वनाथानें तह करून दिला. १७१४ तील शाहूशी तह व १७१५ तील शिंद्दयाशीं तह याची कलमें दुस-या खंडांत दिलीं आहेत.