Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

प्रस्तावना 

१ ह्या खंडांत एकंदर ५६८ लेखांक छापिले आहेत पैकीं, लेखांक १३९ चाफळ येथून, लेखांक १६६ पुणे येथील धडफळे यांजकडून, लेखांक १६७ चाकणाहून, लेखांक १७० वाईतील अयाचिताकडून, लेखांक ५५४ पुणे येथील हसबनिसाकडून, लेखांक ८ व ४७ वाईंतील शेखमिन्याकडून, लेखांक (१४४, १४५, १५७) साता-यातील शिरक्यांकडून, लेखांक (१३६, १६७, १६८, १६९) काव्येतिहाससग्रहकारांच्या दप्तरांतून, लेखांक (९९, १००, १०१, १०६, १०७, १०९, १३४) पांडववाडीतील कोल्हटकरांकडून, लेखांक (१८३-२३४) वाईतील कोल्हटकरांकडून, लेखांक (२३७,२३८,२३९,२४०,२४१,४५३) वाळव्याच्या थोरातांकडून, लेखांक (१३७, १३८, १४०, १४१, १४२, १४४, १४८, १४९, १५०, १५१, १५२, १५३, १५४, १५५, १५६, १५८, १५९, १६०, १६१, १६२, १६३, १६४, १६५) बावधनच्या खेरांकडून, लेखांक (१२१, १२२, १२३, १२४, १२५, १२७, १३३, १३४) वाईंतील शांताश्रमाच्या मठांतून, लेखांक (५६-६४, ६७-७४, ७६, ७७, १७२) ओझर्ड्याच्या पिसाळाकडून, लेखांक (१४६, १४७, १७१) वाईंतील गोविंदराव भानूंकडून, लेखांक (३७०-५५३) कायगांवकर दीक्षितांकडून, व बाकीचे लेखांक ब्रह्मेंद्रस्वामींचे धावडशी व पिंपरी येथील शिष्य जे भागवत त्यांजकडून, मिळाले, लेखांक ७५ लेखांक ७४ चाच अंश आहे व लेखांक १६७ दुबार पडला आहे बाकीचे लेखांक किरकोळ आहेत लेखांक ५६८ काव्येतिहास-संग्रहकारांच्या दप्तरांतील आहे

२ ह्या पत्रात ब्रह्मेंद्रस्वामींची २३६, कायगावकर दीक्षितासबंधी १८४, कोल्हटकरांचीं ५९, च खेरांचीं २३ पत्रे विशेष नावाजण्यासारखी आहेत ब्रह्मेंद्रस्वामींच्या पत्रात आंग्र्यासबंधीं, दीक्षितांच्या पत्रांत बाळाजी बाजीरावासबंधीं, कोल्हटकरांच्या पत्रात नागपूरकर भोसल्यासबंधीं व खेरांच्या पत्रात गोविंदपंत बुदेल्यासबंधी माहिती आहे लेखांक १५७ त थोरले शिवाजी महाराज यांची मुलगी राजकुवरबाई हिचा उल्लेख आहे ह्या मुलीच्या नव-यास दाभोळची देशमुखी शिवाजीनें देऊं केली होती, असे ह्या लेखांत म्हटले आहे लेखांक १४४ त 'चंदीच्या प्रसगें व मसलतेच्या प्रसगें व समजाविशी निमित्ये वतनाचे कागद ज्याने जसे मागितले तसे दिल्हे' म्हणून उल्लेख आढळतो. सकटसमयीं समाजाविशीनिमित्य म्हणजे आगाऊ पगारानिमित्य शिपाई लोकांस राजारामाने वाटतील तीं वतनें करून दिलीं असा ह्या उल्लेखाचा अर्थ होतो लेखांक १६७ त दाभाड्यांच्या व लेखांक ८ त शेखमि-यांच्या पूर्वस्थितीचें वर्णन आहे. लेखांक ६४ त 'एका जातीच्या दोन जाती पाहिल्या' असे शब्द बाटलेल्या सूर्याजी पिसाळाने काढिले आहेत. लेखांक १०७ त मोरो जिवाजी सेनाखासकील याचें नांव आलें आहे ग्रांट डफने आपल्या इतिहासाच्या १४ व्या भागाच्या एका टिपेत सेनाखासखेल ह्या शब्दाचा Leader of the Sovereign tribe असा अर्थ केला आहे.