मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

                                                                                  लेखांक ४.                                                    १७१४ कार्तिक वद्य ४.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री त्रिमलराव स्वामीचे सेवेसी--
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहित असावें विशेष राजश्री हरिपंत तात्या यांचे पागेकडील कोठीचे बैल कसबे घाट नांदूर येथून मौजे उमरगे प॥ गुंजोटी येथील बाजारांत गल्याचे भरतीकरिता आले होते तेथे रात्रीं चोरांनीं बारा बैल नेले त्याचा शोध लागावा ह्मणून कोठवले पुण्यास फिर्याद गेले त्याजवरून पत्रे आलींत कीं बैलाचा शोध लाऊन देवावे त्यास हाली सरबुलंदजंग यांचे पत्र तुमचे नांवे आहे त्याप्रो । बैलाचा शोध लाऊन बारा बैल राजश्री आबाजी बल्लाल कारकून राजश्री तात्याकडील मौजे आवराद प॥ उदगीर येथे आहेत त्याजपासी पावते करून त्याची रसीद घेऊन आह्मांकडे पाठऊन द्यावी येविसी टाळा देऊ नये रा छ १६ र॥वल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.