मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

                                                                                  लेखांक ३.                                                    १७१४ कार्तिक वद्य ४.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री आबाजीपंत स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीय ल्याहावे विशेष तुह्मी राजश्री कोन्हेर बाबूराव यांचे पत्रीं मजकूर लि॥ की एथील मारवाडियांचे नावें आमचा कौल घेऊन पाठवावा व मौजे उमरगे प्र॥ गुंजोटी एथील बाजारात गेल्याचे खरेदीकरितां कसबे नांदूर एथील पागेतून कोठीचे बैल गेले होते तेथे रात्रीं चोरानीं बारा बैल नेले आहेत त्यास एविसी आह्मी राजश्री त्रिमलराव यास पत्र लि॥ असतां अद्याप बैलाचे ठिकाण लाऊन दिल्हे नाही कोठवले पुण्यास तात्याकडे फिर्याद गेले होते मागती माझे नावे पत्र घेऊन आले आहेत कोन्हेरपंत याणी तुमचे पत्रच बजिनस दाखविले त्याजवरून सरबुलंदजंग यांचे व आमचें पत्र राजश्री त्रिमलराव यांचे नांवे एकूण दोन पत्रे पाठविलीं आहेत त्याजकडे रवाना करावी व मारवाडियांचे नावे आह्मी आपला कौल लिहून पाठविला आहे येथील सरकारचे कौलास दिकती आणि लौकर होणार नाही आणि तुमचेहि लिहिण्यांत की आपले नांवानें एक कौल प॥ त्याजवरून पाठविला आहे हा मारवाडियास देऊन दिलासा द्यावा र॥ छ १६ र॥वल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.