मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

काळे-वकलाती पत्रव्यवहार
------------------------
                                                                                  लेखांक १.                                           शक १७१४ कार्तिक वद्य ४. 

कडबा तीन साला येणे त्याचे फडच्याविषयीं आमीलास ताकीदपत्रें पाठवावीं वे जाधव याजकडील कानकुर्ती येथील दुसाला मोकाशाविषई तपसिलें लिहिलें त्यास चिटगोपे-प्रकरणीं सिदी इमामखान आमील यांसी निक्षून बोलून त्यांची ताकीद पा मारी नायब आहे त्यास घेऊन पाठविलीं आहे येके महिन्यांत फडच्या करावा या प्रो ठरून लिहिलें आहे याउपरी गुंता नाहीं जाधवाकडील पा कानकुर्ती येथील मोकाशाच्या सन १२०० सालचा फडच्या नगदी ऐवजाची चिठी पुण्यावर राजश्री नरसिंगराव महिपत नि।। विठल दादाजी यांचे स्वाधीन केली सन १२०१ सालची तनखा नबाबचे सरकारांतून घेतली फडच्याही लौकरच होईल तनखा ज्याजवर आहे ते येथें नाहींत त्यांजकडे तनखा पाठऊन ऐवजाचा फडच्या करून घेण्यास दिवसगत याचकरितां सत्वर फडच्या होण्याची तजवीज केली आहे कडब्याचा म॥र सिदी इमामखा यांसी बोलण्यांत आला त्यास यांचे ह्मणणे कीं हंगामसीर कडबा पेसजीचे कमाविसदार घेत असतील त्या प्र॥ देवीन त्यास चालत आल्या प्रो हंगामी कडबा माहली खान मजकूर यांजपासोन घ्यावा येथे सांगितले आहे र॥ छ १६ र॥वल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंती.