मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)

लेखांक १.

श्री.

यादी बिंदाणे सिवेची मौजे पिसोई ता। कर्‍हेपठार व मालसिरस दोही याची बिंदाणे बित॥
वोढियाचे खालील काठापासून उभा बांद दगडाचा पठारी तिवघा

दक्षणेस पिसोई १ उत्तरेसी टेकवडी १ पूर्वेस मालसिरस १ तेथून खालता उभा बांद सेंधी ४ खिला १ खलवडे १ खिला खलवडिया खालता सेंधे दगडाचे १ फणी खालता उभा बांद दगडाचा त्याचे खालते लवण त्याजखालती ती दगडाची रुरो त्याजखाले पूर्वामुख धोरड माचाडास अडसरावेरी आला तेथे वाटे तरता अडसरी खिला तेथून पुढे वाट वाटेवरी गची खडक वेहलालीची जाली वाटे खालता लवण तेथे धोरड पूर्वामुख गेला आहे तेथून खालता अडसर तेथून पुढे दक्षणेस अडसर त्याच्या माथियाने धोरड दक्षणेस गेला असे माथा खिला मोरीचे झाड त्याजखालते अडसरी खलवडे १ त्याजपुढे खलवडी सुमार ७ साल याजखालती वाट वाटेखालता माथाचा खिला तेथे पांढरजाळीचे झाड खालती धोंडी तेथून पुढे रुरो थोरली पेडालापासून पस्छमेसी पुढे दक्षणेस सेधी * * वारुळ पुढे बेरी * * * सुमार ३ * * * * पुढे सेधे १ पुढे * * * * * * * सेवटीच्या सेधे * * * ती दगडाची पुढला धाकटा १ पुढे तिवधा गांव ४ पूर्वेसी नायगाऊ १ पस्छेमेसी पिसोई १ उत्तरेसी मालसिरस १ दक्षेणेस माविडी १ एकूण गाऊ च्यारी