Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४.
(नकल)
श्रीशंकर.
१५५० श्रावण वद्य १३.
महजर बतेरीख २६ जिल्हेज हाजीर
मजालसी
हाकीम शरा | |
काजी चांदबिन | काजी इसाख |
काजी मनसूर प्रा। | प्रा। इंदापूर |
सुपे | |
काजी --------------- | |
प्रा। चाकण | |
दिवाण लोक | |
शाहाजी अल्ली दतो लिगरस सितोळे देशमुख कान्हो सुपे बिरादर सोमाजी मोकदम मौजे दौंड + + रीदेऊ व माहादो लखमदेऊ कुलकरणी चितपाटिल बिन दाद पाटिल अजहती मलजी भगत मौजे राजेवाडी तुकपाटिल बिन विठपाटिल मोकदम मौजे कोरगाऊ मल्हारजी मोकदम मौजे लोणी तिमाजी बिन माहाद मौजे लोणी तिमाजी बिन माहाद प॥ मौजे खोर दादप॥ बिन देऊपा॥ मोकदम मौजे भिउंडी अमाजी गायकवाड चौगुला मौजे कायवाडी लंबाची खंडप॥ बिन लिंगप॥ मोकदम मौजे पिपरी लिलोजी अजहत देसमुख क॥ सासवड प॥ इंदापूर देशमुख प॥ म॥ रखमाजी कान्हो देशकुलकर्णी |
हैबदराऊ हवालदार व मालो दतो मजमूदार प॥ सुपे मकुंद नरसिह हरकारे नागोजी जगदेराऊ रघोजी बिन जाऊजी मोगदम मौजे खडकी व नरो बाबदेभट बिन लक्षमणभट जोसी काउजी बिन हरजी मोकदम व नाईकजी कोलता मौजे पिसारवे बाजि बिन साउजी मोकदम मौजे पांडवेस्वर कान्होजी बिन एकोजी सितोळे मौजे खडवी सूर्याजी बिन जाउजी प॥ मोकदम व दाद प॥ चौगला मौजे नाहीगाऊ +++ बिन बालजी प॥ मोकदम मौजे एकवडी सूर्याजी बिन बाजी मोकदम मौजे अबिले साहाजी देसमुक मौजेचाकण साउजी प॥ मोकदम मौजे पिसे त॥ खेडेबारें आपोजी निगडे व श्रीपाजी कुलकर्णी अ॥ जाउजी कोडे देशमुख |
गोदजी दुवले अ॥ दतो मानाजी |
बि॥ श्रीपाजी नरसिंह |
सु॥ तिसा आश्रैन अलफ श्रीशके १५४० कालयुक्त सवंछरे मार्गेस्वरवद्य द्वादशी ब्रहस्पतवार ते दिवसी महजर ऐसा जे देहाय प्र॥ पुणे व देहाय प्र॥ सुपे यां दोही विलायतीमध्ये सिवेचा करकसा लागला होता पेशजी कारकीर्दीस खूनखणबिया जालिया तरी दों माहालीचे देशमुख हुजूर हजरती साहेबाचे बंदगीस आणून बदल निवाडा सीव मुनसफीदार पाठविले बित॥
शाहाजी अल्ली दतो लिगरस लग
मकुंद नरसिंह हरकारे
माहालास आले कसबा सुपां मुकाम केला कसबे मजकुरीं व मौजे वढाणें प्र॥ पुणा यां दोही गावास सिवेचा करकशा होता मुनसफीदार कसबे सुपां एऊन मुकाम केलियावर मौजे वढाणे प्रा। पुणे तेथील काऊजी पाटिल बिन आपाजी चौधरी यांचे सेतांत सुपेकराची गुर निघाली ते त्याणे हरदो गावीचा करकसेयाची जमीन दोही खाले होती तेथे भोवडिली यावरी कारकीर्दी एसाजी दिवाकर ठाणेदार प्र॥ सुपे तेहीं ठाणाहून सांगाते तोपची देऊन पाठविला त्या तुबकियाने बार करून काऊजी बिन आपाजी चौधरी आपले सेतांत वढाणे नजीक होता तेथे तुबकियाने गोळीने हाटिला तो मयत जाला हा अमल मुनसफीदारास मोकदम मौजे वढाणे मालूम केला मुनसुफीदारी खबर घेतां सदरहू खून इतबारखान सांगातें तुबकी गेला होता त्याने केला हें लाजिम जाले यावरी एसाजी दिवाकर हवालदार प्रा। सुपे यासि शाहाजी साहेबी सांगितले जे इतबारखान तुबकी हाजीर करा खून जाहाला आहे हजरती मलिकसाहेबाची अदल इनसाफ दखल असतां खून जाहाला आहे तो इतबारखान होता तुबकी हाजीर जाला नाही गैरहाजीर जाला मोकदम मौजे वढाणे रजा देऊन बहुडाविला यावरी विलातीचे सीव निवाडा करावया मुनसिफदाही गस्ती गेली निवाडा करितां करितां कसबे सुपे व मौजे वढाणे यासि सिवेच्या निवाडियाबदल सिवेसी आले खातिरेसी आणितां पाहिले वढाणे- मोकदमे आपली दाद दाखविली कदीम पश्चिमेकडे चौ गावीचा चौधा दक्षेण सुपे कसबेकरीची चोळी मोडोन कसबियाखाले कमाविश होते पश्चमे रिशापिशा उत्तरे वढाणे त्या चौधियापासून बिंदाणेकडे तळई सोनार खिळा पुढें उत्तरें तिवधां तीन गाव सुपे वढाणे पडवी पश्चमे वढाणे पूर्वे सुपे उत्तरे पडवी एणेप्रमाणे हाद दाखविली यावरी सुपेकरी कागद दाखविला तेथे मजमून की स्वस्ति श्री शके १४४६ तारण सवछरे मार्गेश्वर वद्य रवौ तदिनी दसकत कान्हो लुखो पेधो लुखो मलो कोंडो माहार विर्तीकार मौजे वढाणे आत्मसुखें पेधो मालोस व पेधोई मालीस लेहोन दिधले ऐसे जे मौजे चिचोली मजरा सुपाचा तेथील सिवेची सेते वढाणेयाखाली पडिली होती तें दिव करून साधिली तें लेकुराचे लेकुरी औलादी अफलादीनसी खाइजे ए बाबे मी उभा राहे माझीए वंसीचा उभा राहे तरी दिवाणी खंड सिसे २ टके ५००० देणे अन्यथा नाही हदमहदूद वरिलीकडील तरडा देवीचा त्रिसूळ तिवधा पिशाची चोळी वढाणे तेथून चिचेवरील राजोखाट तेथून बिंदाणे पाढरजुळीचा खिळा तेथे तिवधां चिचोळी सुपे वढाणे हा तिवधा तेथून हद एकतलईची पाली तेथून खाईल वड देऊळगावीची वाट तेथून तिवधां पडवी वढाणे सुपे हे सीव तुवा खाइजे या बोलास अन्यथा नाही याचे गोही लिहिले आहेत बित॥