मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

निजामअल्लीखानास व खंडोजी भों। यांसी शुकें स्वामीचे आज्ञेप्रमाणे लिहिविली आहेत, ती तयार करून सेवेसी मागाहून पाठवितों. नजबखानानीं करार केला आहे की, पातशहास अंतर्वेदीतील डेरेदाखल करतों व इंग्रजाचे कलकत्याकडे भोंसले यांणी तान सरदारांनी त्यांचा पिच्छा न सोडावा. कर्णे स्वामीचे स्वाधीन आहे. एविषयी हुजूर विनंति लिहावयासी सेवकास सांगतात कीं, सलूख कदाचित् केला तरी पुढे जड जाईल. इंग्रजीच जाली तर हिंदुस्थानात गेलें, कोणाचे बरें नाही ह्मणतात. ते सेवेसी लि।।. असे. आपण समयोचित उत्तर असेल ते करावें. स्वामीप्रतापें र्इश्वर फत्ते करील तो सुदिन. पूर्वी ही एक दोनदा सेवेसी विनंति लि।। की, नजबखानांनी श्रीमंतांचे पत्रांत अलकाब केवल हलका स्थितीप्रो. मुनसी लिहितात. त्यासी करून राप्रमाणें पत्रांत श्रीमंत स्वामीकडोन आणावयास आज्ञा केली पाहिजे. वाढऊन लिहिणियानें मनास उछाह होऊन कामास तत्पर विशेष होतील ते करावें. हलके फारसे लिहावें, यास्तव विषम मानतील. आहश्रुत केलें की, आमची पत्रें श्रीमंतांस पावली. याजवर वजिराप्रोंच लिहितील याप्रमाणें सांगोन समाधान केले. श्रुत होय. कृपा केली पाहिजे. येथील बाह्य अंतर सविस्तर ध्यानारुढ असावें, याजकरिता लि।।. अधिक विस्तारें करितां रागास यावें. श्रीमंत स्वामीस पातशाई इनात टिक्का वगैरे घेऊन यावें यास्तव उत्कंठा. कर्जदारीमुळें एकादसी, सिवरात्र मोडावयास्तव बाळाजी व गंगाधर गोविंदास सरकारची सनदापत्रें पाठविली, त्यांचे उत्तरही न देत. मग नेमणुकेप्रों. बाकीचें पाठवणे व वसुलीजमेचे गांव लाऊन देणें कळतच आहे. तुह्मांस हुजूर लिहावें त्यांचे उत्तर याजवरच ताकिदीनें आज्ञापत्रें येतात. ते उत्तरही न देत. पांच-साला-एक-साला-कमाल जनेचे गाव लाऊन दिल्हे आहेत, त्याच गावांवर दुसाला कर्ज दहा हजार कालपी प्रांतीचे साहुकारांकडून आणविले. एकही कर्ज मागील देणें गावांवरील आले आहे याजमुळे न मिळे. दुसरे कारण खंडेराऊ, हरि पवार वगैरे फौज ग्वालेर प्रांत सोडून झांसी प्रांत व काचेकालपी फटमार करावयासी पोट भरावयासी गेले आहेत. कछ व घरांत गोहदकराचा अंमल जाला. इंग्रजसहित गोदकराने रात्रौ छापा घातला. पांच सहासें घोडें, माणूस जमविलें. आतां सुरक्षित भोडरीस आहेत. हेंही कारण जालें. या दिवसांत सेवकाचे हुजूर येणे व येथे ठरवणे दुस्तर जालें जाणून मान्य करून, बाळाजी गोविंदाचे कारभार सत्वरच जाऊन एकसाला रुपये येथें उपवास पा। कीं येथील देणें वारून सेवेसी येऊन बुंधीलकंडाचे व झांसीचे रु।। कुल-ब-साल कांही स्वामीस पावत तो व च्यार श्रुत करूं. बाळाजीपंत कायम राहून सरकारकाम होई तें करावेंसी मर्जी जाल्यास विनंति करू. सेवकाची नेमणूक दिली यास्तव लिहीत नाही. त्याचे अस्तायस्तपणे सरकार काम होत नाही, ह्मणोन तात्पर्य लि।। असे. तरी हरएक साहुकारापासून कर्ज घेऊन सेवकास दहा हजार रु।। जरूर पाठविणार स्वामी समर्थ आहेत. व या रुपयांची तनखा साहुकारांची बाळाजी गोविंदाचे कारकुनावर करी की त्यास तिडीक लावून रु।। हुजूर आणोन देईल तें केले पाहिजे. निराश्रित सेवकास दर्शनलाभ देऊन सनाथ करावायासी आपण समर्थ आहां. स्वस्थ चित्ते बुध्धी य: संभवती कृपा केली पाहिजे. दर्शनलाभ होई तो सुदिन. श्रीचे कृपेकरून स्वामीचा प्रताप अधिकोत्तर होय ते सुघडी. बहुत काय लिहूं ? हे विनंति.