मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्रीवरद.

लेखांक ४.

१७०२ ज्येष्ठ वद्य ३.
पो। छ २५ रमजान.

श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
पो पुरुषोत्तम महादेव कृतानेक सां। नमस्कार विनंति येथील कुशल ता। छा।- १६ माहे जमलादिलावर मुक्काम दिल्ली जाऊन स्वकीय लेखन करीत असिलें पाहिजे. विशेष. छ २६ रबिलावरची पत्रें पाठविली छ २३ जमादिलावली पावलीं.

पत्रीं आज्ञा की :- अलीकडे तुह्मांकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. त्यास, सविस्तर वरचेवर लिहीत असावें. सरकारांतून पातशाहास अर्जी व नबाब नजबखानास पत्रें आह्मांकडून खानमजकुरास पत्रें पाठवली आहेत. ती त्यांस देऊन लिहिल्याप्रमाणे सर्व गोष्टी घडून येत तें करावें. फारसी सवाल मजकूर तुह्मांस कळावे याकरितां पत्रें पाठविली आहेत त्यावरून कळेल. कितेक मा। अलाहिदा पु।।-पत्रीं लि॥ त्याप्रों अमलांत आणणें, ह्मणोन लि॥. विनंतिपत्र सु।। पाठवितों, उत्तरेंही सेवकास येतात. व आज्ञेप्रो पत्रें आपली व सरकारची पातशहास नजबखानास देऊन त्यांस इंग्रजांचे शाक करावेसें वारंवार बोध करून ठेविला आहे. त्याचा ता। सरकारांत विनंतिपत्रें लि॥ आहेत. त्याजवरून ध्यानास येईल. यथाज्ञानेकरून जे चाकरी घडून येईल तीस अंतर करणार नाही. लोकांचे येथील देणें वारून स्वामींदर्शन घडे तें करणार आपण आहेत. खर्चाची आबाळ विशेष. यास्तव विनंति करणार स्वामी समर्थ आहेत. सविस्तर पुर्वणीपत्रावरून श्रुत होईल. नजबखानांनी स्वामीस पत्र बहुत स्नेहवृध्दीनें सरकार उपयोगी लि।। आहे. याचे उत्तरी विशेष लोभानें व पातशहास इंग्रजांचे मोहिमेस घेऊन निघता ह्मणोन सेवकाने तुचे जबानी लि।। त्यावरून बहुत संतोष जालियाचें ल्याहावयासी आज्ञा करावी. कृपा केली पाहिजे. दर्शनलाभ होय तो सुदिन. हे विनंति.