मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्रीवरद.

लेखांक ३.

पौ छ २५ रमजान
१७०२ ज्येष्ठ वद्य ३.

पु।। श्रीमंत राजश्री पंत प्रधान स्वामींचे सेवेसी :-
विज्ञप्ति ऐसीजे :- पत्री आज्ञा कीं : पातशहास अर्जी व नवाब नजबखान जुनफुकार द्दौलेबहादूर यांस सरकारांतून पत्रें इंग्रजांचे तेंबीविशई रवाना केलीं आहेत, व द्दौलेबहादूर यांस राजश्री बाळाजी जनार्दन यांनी विस्तारें लिहिलें आहे, हा मजकूर तुह्मांस समजावा सबब मसोदे पाठविले आहेत, त्याजवरून कळेल त्याप्रों बोलून इंग्रजांची मसलत लिहिल्याप्रों विष्कलित होऊन सरकाराकाम अमलांत येईल तें कर्णे. सविस्तर बाळाजी जनार्दन लिहितात त्याजवरून कळेल. म्हणून पत्रीं आज्ञा. त्यास, स्वामींचे आज्ञेप्रों पादशहास वरचेवर उत्तेजन देऊन इंग्रजांचा यांचा स्नेह संपन्न होता तो तोडिला. सेवकासी पातशहानीं व नबाव नजबखानानीं शफत वाहून सांगितलें कीं जें नानानीं लिहिलें आहे हेंच आमचे चित्तांत आहे. याप्रोंच करूं. ह्मणोन वचन दिधलें. वजीराकडील च्यार हजार फौजेनिसी पातशहाचे तैनातीस लताफत आहे, त्याचा आमचा जोड आहे, आपले सेवेसी फौज दोन हजार सेवकापासीं आसल्यास पातशहाचे मनास आल्हाद होईल, अत:पर श्रीमंतांस लेहून आपले सरकारची फौज हुकुमांत राहिसी जलदीनें हजुरांत ते करणें, ह्मणून सो लिहावयासी सांगितले तें लिहिलें असे. व आपला मातबर माणूस सेवकाचे समागमें देऊन सों रवाना करिन ह्मणतात. अमलांत येईल तें मागाहून विनंति लिहू. त्याची जागा या स्थलीं सरकारची फौज असिल्यास यांजवर दक्ष राहून शत्रूचे पारपत्याची तजवीज वरचेवर होईल ते सेवक करितील. प्रथम पातशहापासीं खर्चाची तंगी. त्याज एक उमराव त्याजला दुसरियाचें नाही. त्यांत मोगल लोक काबूची. सेवेसी विनंति लिहिली आहे. तर असलियासी एक दोन पथकें घोडो व पवार तऱ्ही सेवकाचे तेनातीस प।। कीं, सरकारचे फौजांची आमदनी कळून याजला नवा प्रांत घेऊन खर्चाची तंगी दूर करावयाची उमेद दाखऊन कंबर बांधऊन, डौल दाखल करऊन ते चाकरी करूं. इंग्रज तूर्त खर्चास रु॥ देऊ ह्मणतात. आह्मी फारसी गोष्ट फौजेस सांगून नफे भारी दाखऊन, स्वामी ज्ञेप्रों आजवर इंग्रजांचा रुपया हास घेऊं दिधला नाही व वचनीहि देत नाही. पातशाह स्वामीस रु।। मागत नाहींत, फौज आणा ह्मणतात. यास्तव वेसीं लिहिलें असे. गोदहप्रांतीं पथके आहेत त्यांपो। एखाद दोन पथके सेवकापासी राहिल्यास सरकार उपयोगी आहे. श्रुत उत्तम असेल तें करणार स्वामी समर्थ आहेत. कृपा केली पाहिजे. हे विज्ञप्ति.